शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Nirjala Ekadashi 2022: निर्जला एकादशीला पाणीदेखील पिऊ नये असे धर्मशास्त्र का सांगते, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 14:43 IST

Nirjala Ekadashi 2022: तेवीस एकादशीचे पुण्य एका एकादशीत लाभणार, म्हणजे नियमही कडक असणारच ना! जाणून घ्या सविस्तर संकल्पना...

११ जून रोजी निर्जला एकादशी आहे. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. पण असे म्हणतात, की निर्जला एकादशी केली आणि उर्वरित २३ एकादशी केल्या नाहीतर तरी त्या २३ एकादशीचे पुण्य लाभते. म्हणून या एकादशीला महत्त्व असते. मात्र एवढे पुण्य एकत्र साठवायचे तर नियमही कठोर असणारच ना? निर्जला एकादशीला दोन्ही वेळी खायचे तर नाहीच, शिवाय पाणीदेखील प्यायचे नाही असा नियम आहे. त्यामागील कारण काय असावे, ते जाणून घेऊ. 

निर्जला एकादशीच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे व्रत ऐन पावसाळ्यात येत असल्याने, पावसाचे पाणी साठवा अन्यथा बिनापाण्याचे राहावे लागेल, असा संदेश जणू काही या व्रताच्या निमित्तानेशास्त्रकारांनी दिला आहे. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केले जाते. द्वादशीला कृष्णाला फुल वाहून या उपास सोडला जातो. 

एकादशीचा उपास म्हणजे महिन्यातून दोन दिवस तोंडाला आणि पोटाला पूर्णवेळ विश्रांती देण्याचा दिवस असेही मानले जाते. अर्थात जे लोक फराळ न करता एकादशी करतात हे विधान त्यांना लागू होते, एकादशी अन दुप्पट खाशी वाल्यांना नाही! देवाचे नाव घेत विषय, विकार, वासना यातून मन अलिप्त करावे यासाठी दर महिन्याला विष्णू उपासनेच्या स्वरूपात एकादशीचा उपास, व्रत करा असे सांगितले जाते!

आरोग्य, शरीरशुद्धी, अपचन, रोगनाश, इ. साठी मनुष्यच नाही, तर पशूपक्षीही उपवास करतात. पशु किंवा पक्षी यांना अपचन झाले असता किंवा एखादा विकार, रोग झाला असता, ते कडकडीत उपास करतात. कोणताही खाद्यपदार्थ त्यांच्यापुढे ठेवला तरी ते स्पर्शही करत नाहीत. काही कुत्रे, गायी तर जन्मापासून आयुष्यभर विशिष्ट दिवशी उपवास करतात. यावरून मानवाने उपवासाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. 

अतिरिक्त अनावश्यक अन्नेसेवनाच्या संदर्भाने वैदिक धर्मास उपवास, लंघन, अल्पाहार, लघुआहार, दुग्धाहार, फलाहार इ. कल्याणकारक योजना सांगितलेल्या आहेत. त्यांनाही आजच्या विज्ञान शाखांनी उपयुक्त, योग्य व शास्त्रीय अशी मान्यता दिली आहे. शरीरात दोन प्रकारची इंद्रिये/ अवयव आहेत. कधीही विश्रांती न घेता अखंड क्रियाशील असणारी आणि विश्रांती घेऊन कार्य करणारी.जन्मापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत अहोरात्र, अखंड, अविश्रांत क्रियाशील असणाऱ्या इंद्रियांमध्ये हृदय, रक्तवाहिन्या, पुâफ्पुâसे, अन्नाशय, जठर, जठराग्नि, अन्ननलिका इ. चा अंतर्भाव होतो.

विश्रांती घेत कार्य करणारी इंद्रिये म्हणजे हात, पाय, नाक, कान, डोळे, जीभ, मन इ यातील अन्नाशय, जठर, जठराग्नि अखंड अहोरात्र कार्यरत असतो. कधीही विश्रांती घेत नाही. उपवासाने त्या अंशत: तरी विश्रांती दिली जाते. विश्रांती देण्याने त्या इंद्रियाची कार्यशक्ती, कार्यक्षमता यात वाढ होते व ती शरीराला, आरोग्याला उपयुक्त ठरते.

उपवासाचा मुख्य लाभ आहे, की अन्नाशयात र्जात न पचलेली, अशुद्ध द्रव्ये, अन्नघटक, त्यातून उत्पन्न होणारी विषारी द्रव्ये, विषाणू, रोगबीजे, रोगाणु, रोगजंतु इ. सर्व उपवासाने जणून जातात, नष्ट होतात. त्यामुळे रोगांचाही आपोआप व सहजच नाश होतो. त्यामुळे आजाराची कारणे कमी होतात आणि दीर्घायुष्य लाभते. म्हणून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एकभुक्त किंवा दोन्ही वेळचा उपास अवश्य करा, असे म्हटले जाते. उपासनेला उपासाची जोड मिळाली असता, तनामनाची शुद्धी होते. म्हणूनही अनेक भाविक महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीचा वर्षभर उपास करतात.