शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Nirjala ekadashi 2021 : निर्जला एकादशीनिमित्त करा जलकुंभदान, होईल माणुसकीचे आदान-प्रदान! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 10:28 IST

Nirjala ekadashi 2021: दानाचा उद्देशच हा आहे, की समोरच्याची गरज ओळखून अडल्या-नडलेल्याला यथाशक्ती मदत करणे.

निर्जला एकादशीच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे व्रत ऐन पावसाळ्यात येत असल्याने, पावसाचे पाणी साठवा अन्यथा बिनापाण्याचे राहावे लागेल, असा संदेश जणू काही या व्रताच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांनी दिला आहे. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केले जाते. द्वादशीला कृष्णाला फुल वाहून या उपास सोडला जातो. त्याचबरोबर या दिवशी जलकुंभदान करण्याची प्रथा आहे. 

दानाच्या अनेक प्रकारांमध्ये जलकुंभदानाला महत्त्व आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण जसे आदरातिथ्य म्हणून पाणी देतो, तसेच पावसाळ्यात मचूळ पाण्यामुळे अनेक गरीब कुटुंबियांना दुषित पाणी प्यावे लागते. यासाठी अशा कुटुंबांना आपल्या कडून एक घडाभर स्वच्छ पाणी पुरवता आले, तर ते जलकुंभदान पुण्यदायी ठरेल.

दानाचा उद्देशच हा आहे, की समोरच्याची गरज ओळखून अडल्या-नडलेल्याला यथाशक्ती मदत करणे. जलदान केवळ उन्हाळ्यात नाही, तर पावसातही गरजेचे आहे, हे ओळखून वस्त्रगाळ केलेले अथवा उकळलेले पाणी गरजवंतांना द्यावे, यासाठी निर्जला एकादशी निमित्त या विधीचे आयोजन केले आहे.सर्व पापांचा नाश होऊन स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत केले जाते.

नायजेरियातील कुपोषित बालकाला पाणी देणारी समाजसेविका, माणुसकीचे उत्तम उदाहरण!
 नायजेरियातील कुपोषित बालकाला पाणी देणारी समाजसेविका, माणुसकीचे उत्तम उदाहरण!

आदल्या दिवशी गंगादशहरा पूर्णत्वास जातो. तर ज्येष्ठ शुक्ल एकादशी ही `निर्जला एकादशी' म्हणून प्रसिद्ध आहे. पाण्याचे महत्त्व निर्जला एकादशी केल्याशिवाय कसे कळणार? पाण्याला आपण `जीवन' म्हणतो. `जलति जीवयति लोकानिती' म्हणजे जीव जगवण्याचे काम पाणी करते. मग तो प्राण्यांचा असो की, वृक्षवेलींचा! सर्व उपचारविधी करता येणे शक्य नसेल त्यांनी निदान चार पाच जणांना थंड पेय पदार्थ तरी जरूर द्यायला हरकत नाही. 

अशा तऱ्हेने तुम्हीदेखील हे सोपे व्रत अथवा जलदान विधी करून पुण्याचे भागीदार सहज होऊ शकता.