शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:08 IST

Narmada Pushkaram 2024: १ ते १२ मे रोजी नर्मदा पुष्करम पर्व सुरू होत आहे, वृषभ राशीत गुरु संक्रमण झाले की हे पर्व सुरू होते व या पर्वात नर्मदा स्नानाला महत्त्व असते!

>> सर्वेश फडणवीस 

नर्मदा !! अखंड, वैराग्य आणि आनंद देणारी नदी. आज तिची जयंती. नर्मदा नदी जगातल्या प्राचीन नद्यांपैकी एक. धार्मिक आणि आध्यात्मिक कारणासाठी जगामध्ये एकमेव नदी जिची संपूर्ण प्रदक्षिणा करू शकतो. ठराविक यम-नियम पाळून हीची प्रदक्षिणा नक्कीच अंतर्मुख करते. नर्मदा ही आनंददायिनी, सुख व कल्याण करणारी आहे. एक वर्णन असंही वाचण्यात आहे की; गंगा ज्ञान देते, यमुना आनंद देते, सरस्वती वैराग्य देते; आणि नर्मदा ज्ञान, वैराग्य, आनंद तिन्ही देते.

सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितंद्विषत्सु पापजातजातकादिवारिसंयुतम् ।कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदेत्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ।। 

आजोळ जबलपूरला असल्यामुळे नर्मदेचे चे दर्शन नियमित होतेच. अतिशय विशाल पात्र असलेले ठिकाण म्हणजे ग्वारीघाट. शहरापासून जवळ असलेले आणि स्वच्छ पात्र असलेले असे हे ठिकाण. या ठिकाणी व पुढे भेडाघाटच्या संगमरवरी खडकात शांत झालेली नर्मदा आणि धुवांधारला रौद्र आवाज करत कोसळणारी नर्मदा हीचे दोन विविध रूपे एकाच ठिकाणी बघायला मिळतात.

नर्मदेचा सुंदर किनारा, किनाऱ्यावरची वने, विस्तीर्ण होत जाणारे तिचे पात्र, साधू संतांच्या तपसाधनेने पवित्र झालेला परिसर म्हणजे नर्मदा नदी. आज माघ शु. ७ म्हणजेच रथसप्तमी या तिथीला नर्मदा पृथ्वीवर अवतीर्ण झाली म्हणून हा दिवस "नर्मदा जयंती" म्हणून साजरा करतात.

॥ श्री नर्मदा अष्टकम ॥

सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितमद्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतमकृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥1॥

त्वदम्बु लीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकमकलौ मलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकंसुमस्त्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक् शर्मदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥2॥

महागभीर नीर पुर पापधुत भूतलंध्वनत समस्त पातकारि दरितापदाचलमजगल्ल्ये महाभये मृकुंडूसूनु हर्म्यदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥3॥

गतं तदैव में भयं त्वदम्बु वीक्षितम यदामृकुंडूसूनु शौनका सुरारी सेवी सर्वदापुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥4॥

अलक्षलक्ष किन्न रामरासुरादी पूजितंसुलक्ष नीर तीर धीर पक्षीलक्ष कुजितमवशिष्ठशिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥5॥

सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षटपदैधृतम स्वकीय मानषेशु नारदादि षटपदै:रविन्दु रन्ति देवदेव राजकर्म शर्मदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥6॥

अलक्षलक्ष लक्षपाप लक्ष सार सायुधंततस्तु जीवजंतु तंतु भुक्तिमुक्ति दायकंविरन्ची विष्णु शंकरं स्वकीयधाम वर्मदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥7॥

अहोमृतम श्रुवन श्रुतम महेषकेश जातटेकिरात सूत वाड़वेषु पण्डिते शठे नटेदुरंत पाप ताप हारि सर्वजंतु शर्मदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥8॥

इदन्तु नर्मदाष्टकम त्रिकलामेव ये सदापठन्ति ते निरंतरम न यान्ति दुर्गतिम कदासुलभ्य देव दुर्लभं महेशधाम गौरवमपुनर्भवा नरा न वै त्रिलोकयंती रौरवम ॥9॥

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३