शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संगीत आपल्याला सर्व प्रकारचे दु:खं विसरायला लावते; सूर ज्योत्स्ना सोहळ्यात गौर गोपालदासांशी मराठीतून संवाद!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 17, 2021 21:33 IST

दैनंदिन लोकमत आयोजित सूर ज्योत्स्ना या पुरस्कार सोहळ्यात गौर गोपाल दास प्रभू यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांच्याशी निगडित अनेक चांगल्या गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टी मराठी मातीशी निगडित असल्यामुळे त्या ऐकून चाहत्यांनाही आनंद झाला.   

पूर्वीचे लोक प्रेरणादायी विचार मिळवण्यासाठी पुस्तकांचा, व्याख्यानांचा, कीर्तन-प्रवचनातून श्रवणभक्तीचा आधार घेत असत. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. लोकांकडे पुरेसा वेळ नाही. परंतु आताच्या आव्हानात्मक काळातही प्रेरणादायी विचारांची गरज कमी झालेली नाही, तर अधिकच  वाढलेली आहे. लोक एकमेकांपासून दुरावले जात आहेत, नात्यांमध्ये विसंवाद निर्माण होत आहे, प्रेमाची जागा अहंकार घेत आहे. अशा वेळी लोकांना आधार आहे, तो समाज माध्यमांवरील प्रेरणादायी वक्त्यांचा! अशा वक्त्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते, गौर गोपालदास प्रभू यांचे. इंग्रजी भाषेत परंतु सहज सोप्या शब्दात मांडलेले विचार, प्रेरक कथा, दैनंदिन समस्यांवरील तोडगे, यांमुळे गौर गोपाल दास यांचे अनेक व्हिडिओ ऐकले व शेअर केले जातात.

दैनंदिन लोकमत आयोजित सूर ज्योत्स्ना या पुरस्कार सोहळ्यात गौर गोपाल दास प्रभू यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांच्याशी निगडित अनेक चांगल्या गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टी मराठी मातीशी निगडित असल्यामुळे त्या ऐकून चाहत्यांनाही आनंद झाला.   गौर गोपालदास प्रभू यांचा जन्म पुण्यात देहू रोड परिसरात झाला. त्यांचे शिक्षणही पुण्यात झाले. त्यांचा मित्रपरिवारदेखील मराठमोळा असल्याने त्यांना छान मराठी बोलता येते. एवढेच नाही, तर त्यांनी बरेचसे मराठी साहित्यदेखील वाचले आहे. आपल्या सर्वांचे लाडके पु.ल.देशपांडे आणि व.पु.काळे हे त्यांचे आवडते लेखक आहेत. गौर गोपालदास यांच्या `लाईफ अमेझिंग सिक्रेट' या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. तसेच लवकरच मराठीत प्रेरणादायी विचारांचे व्हिडिओ करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सूर ज्योत्स्नाच्या निमित्ताने संगीताबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. ते म्हणतात, 'संगीतामुळे अवघड परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळते, तसेच गाण्यातील शब्द आपल्या मानसिक आघातांवर संजीवनीसारखे काम करतात. म्हणून संगीताला आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त स्थान द्या, असे ते सुचवतात. त्यांचे आवडते मराठी गायक कोण, असे विचारले असता क्षणाचाही विलंब न करता ते सांगतात, `मला बाबुजींचे गीतरामायण आणि सुरेश वाडकरांचे ऊँकार स्वरूपा अतिशय आवडते.'

सूर ज्योत्स्ना या कार्यक्रमाप्रसंगी गौर गोपालदास प्रभू यांनी मराठीतून साधलेल्या संवादामुळे त्यांची भेट श्रोत्यांसाठी आणखीनच सुरेल ठरली. लवकरच त्यांच्या मधुर वाणीतून मराठी व्हिडिओ ऐकायला आणि पहायला मिळतील अशी अपेक्षा करूया.