शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कलीयुगात आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच खरे तारणहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 13:22 IST

जगामध्ये संसार कुणाचाही पुरा होत नाही. या जगामध्ये कुणाचेही पोट भरत नाही. त्यामुळे सध्याच्या कलयुगामध्ये आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच खरे तारणहार आहेत.

अध्यात्म

गोरक्षनाथ महाराज शिंदेदत्त मंदिर प्रमुख,तळवडी (ता. कर्जत), जि. अहमदनगर.

 

जो मज अनन्य शरण। त्याचे निवारी मी जन्म मरण। या लागी शरणगता शरण्य मि चि एकू।।८८

ही नवव्या अध्यायातील ओवी आहे. ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय म्हणजे भक्ती योग आहे. भक्तीचा महिमा सांगणारा हा अध्याय आहे. जो मला एक एकनिष्ठेने शरण येतो. त्याला जन्म मरणापासून मी मुक्त करतो म्हणून शरणगताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी नवव्या अध्यायामध्ये भक्तीयोग मांडला आहे. या ओवीमध्ये चार भाग पडतात. ते असे- १) शरण जाणारा कोण?  २) शरण कोणाला जायचे?  ३) शरण कशा प्रकारे जायचे? ४) शरण गेल्यानंतर फायदा काय होतो?

पहिल्या भागात शरण जाणारा कोण? यावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाला उत्तर देताना सांगितले की, शरण जाणारा जीव आहे. जीव हा बध्द अवस्थेत असतो. त्याला जन्म-मरणाचे बंधन असते म्हणून शरण जाणारा जीव होय.

दुसºया भागात शरण कोणाला जायचे? तुकाराम महाराज कलयुगामध्ये ३३ कोटी देव आहेत. त्यापैकी कोणत्या देवाला शरण जायचे? याबाबत ज्ञानेवर महाराज सांगतात..अशा देवाला शरण जायचे त्याचे पाय सम आहेत. ज्याची दृष्टी विटेवर आहे. ज्याचे हात कमरेवर आहेत. अशा विठ्ठलाला शरण जायचे. 

शरण कशा प्रकारे जायचे?-एके ठिकाणी चोखामेळा म्हणतात,

ऊस ढोगा परी रस नव्हे ढोगा।।काय भुललाशी वरिल्या रंगा।।नदी ढोगी परिजल नव्हे ढोगे।।चोखा ढोगा परि भाव नव्हे ढोगा।। 

शरण कशा प्रकारे जायचे..यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनन्य भावनेने शरण जायचे. 

चवथ्या भागात शरण गेल्यावर काय फायदा होतो. यावर ज्ञानेश्वर महाराज  म्हणतात.., जगात सर्व गोष्टी फायद्यासाठी करतात. तर देवाला शरण गेल्यावर फायदा काय होतो. तर देव आपल्याला चौºयांशी लक्ष योनीमध्ये आपल्याला साक्षी असतो. या जन्म मरणापासून मुक्ती करतो. 

याबाबत एक उदाहरण देता येईल.एक गजेंद्र असतो. तो पाण्यात जातो. त्याला नक्र पकडतो. त्यावेळी तो आपल्या पत्नीला हाक मारतो. मुलाला हाक मारतो तरीही ते येत नाहीत. शेवटी एक फळ घेतो. गजेंद्र हे फळ जगाच्या कर्त्याला अर्पण करतो. लगेच भगवान विष्णू येतात. गजेंद्राला नक्राच्या तावडीतून सोडवतात. याप्रमाणेच मानवी जन्म लक्ष ८४ योनी सुकल करतो. तो भवगनात आहे हा फायदा  होतो. 

याचा सार असा आहे की, या जगामध्ये संसार कुणाचाही पुरा होत नाही. या जगामध्ये कुणाचेही पोट भरत नाही. त्यामुळे सध्याच्या कलयुगामध्ये आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच तारणहार आहे. त्यासाठी प्रत्येकाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची जोपासना करणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतAdhyatmikआध्यात्मिक