शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्यात शनी देवांपासून 'या' तीन राशींनी बाळगावी विशेष सावधगिरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:43 IST

शनी ग्रहाचे वक्र परिवर्तन म्हणजे परीक्षेत परीक्षा असे मानण्यास हरकत नाही. 

शनी हा ग्रह अत्यंत कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी दशेचा आपल्या आयुष्यावर विशेष प्रभाव पडत असतो. आपल्या कुंडलीतील ग्रहस्थितीव्यतिरिक्त दर मासाला नभोमंडलात बदलणारी ग्रहदशादेखील आपल्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकत असते. त्यातही जेव्हा शनीचे भ्रमण सुरु होते, त्यावेळेस बाराही राशींवर त्याचे कमी अधिक परिणाम दिसून येतात. परंतु जुलै महिन्यात शनी वक्र दिशेने भ्रमण करत असल्यामुळे तीन राशींनी सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. हा काळ तुमच्यासाठी परीक्षेचा काळ ठरू शकतो. या तीन राशी कोणत्या ते पाहू... 

धनु, मकर आणि कुंभ राशीवर साडेसाती सुरु आहे. धनु राशीसाठी साडेसातीचा अंतिम टप्पा आहे, मकर राशीचा मध्यम टप्पा आहे आणि कुंभ राशीसाठी साडेसातीचा सुरुवातीचा काळ आहे. साडेसाती या शब्दाने भयभीत होण्याचे कारण नाही. परीक्षेला घाबरून चालत नाही. आपण अभ्यास केला असेल तर परीक्षेची भीती वाटत नाही आणि केला नसेल तर नापास होण्याची भीती वाटते. त्याचप्रमाणे साडेसातीच्या काळात आपला प्रामाणिकपणा, इतरांना मदत, संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता, चांगल्या वाईट लोकांची ओळख अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत कस लागतो. हा काळ अपयश देणारा नसून आपल्या आयुष्यातील वास्तवाचे दर्शन घडवणारा असतो. त्यामुळे शनी ग्रहाचे वक्र परिवर्तन म्हणजे परीक्षेत परीक्षा असे मानण्यास हरकत नाही. 

या काळात कोणत्या गोष्टी घडू शकतात?

आपण सगळेच जण दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या संकटांना सामोरे जातो. पण काही वेळेस संकट एकटे येत नाही, तर ते संकटांची शृंखलाच सोबत घेऊन येते. अशा वेळेस न डगमगता त्याला सामोरे जाणे ही आहे परीक्षेत परीक्षा!अनेकदा आपल्या संयमाचा कस लागतो, त्यावेळेस आपला शारीरिक, मानसिक, आर्थिक तोल ढासळू न देता, मनाचा संयम कायम ठेवला पाहिजे. आजारपणात किंवा आर्थिक अडचणींमध्ये मनुष्य पूर्ण खचून जातो. त्यावेळेस उमेद सोडून न देता, इच्छा शक्ती वाढवून त्या संकटाना तोंड देता आले पाहिजे. या आणि अशा अनेक गोष्टी जिथे आपल्याला आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहणे गरजेचे असते, ती तत्त्व सोडून न देता परिस्थितीला सामोरे जाणे अभिप्रेत असते. हीच आहे साडेसाती!

त्यात पुढील उपाय केले असता, मानसिक बळ मिळून शनीदशेचा प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकेल. 

    • हनुमान आणि शंकराची पूजा करावी. 
    • पिंपळाच्या झाडाशी दर शनिवारी राईच्या तेलाचा दिवा लावावा. 
    • अज्ञात लोकांशी परिचय करताना किंवा त्यांच्यासोबत काम करताना सावधगिरी बाळगावी. 
    • दर शनिवारी काळे उडीद, काळे तीळ, तेल आणि रुईच्या पानांचा हार शनी देवाला वहावा. 
    • शक्य असल्यास पूर्ण महिनाभर मांसाहार आणि मद्यपान टाळावे. विशेषतः शनिवारी तरी नक्कीच व्यर्ज्य करावे. 
    • चिमण्यांना दाणा पाणी आणि मुंग्यांना साखर टाकायला विसरू नका.