शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Mohini Ekadashi 2023: सर्व मनोकामनांच्या पूर्ततेसाठी १ मे रोजी 'असे' करा मोहिनी एकादशीचे व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 11:33 IST

Mohini Ekadashi 2023: मोहिनी एकादशीच्या व्रताने सर्व दुःखं दूर होऊन संसाराची आसक्ती कमी होते, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!

हिंदू धर्मानुसार, मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाचे विधिने पूजन केले असता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात एकादशी दोनदा येते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. यंदा १ मे रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी व्रत कर्त्याने पूर्ण दिवस उपास करावा आणि भगवान विष्णूंची उपासना करावी. मोहिनी एकादशीला भगवान विष्णूचे मोहिनी रूप मानले जाते. धार्मिक मान्यता अशी आहे की मोहिनी एकादशीचे व्रत ठेवल्याने सर्व दु: ख दूर होतात आणि व्यक्ती सर्व बंधने व आसक्ती यापासून मुक्त होते. 

भगवान विष्णूनी मोहिनीचे रूप धारण का केले, त्याची कथा-

हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, समुद्र मंथनानंतर बाहेर ;पडलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला. हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली. मग राक्षसाचे लक्ष कलशांच्या अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. भगवान विष्णूचे सुंदर स्त्रीरूप  पाहून राक्षस आकर्षित झाले. त्यावेळेस देवांनी अमृत प्राशन केले. ही घटना वैशाख महिन्याच्या शुक्ल एकादशीला घडली असे म्हणतात. तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. व या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते.

पूजेची पद्धत

मोहिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी सकाळी उठून स्नान करावे. त्यानंतर, पूजास्थळावर बसून भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा यांची पूजा करावी. भगवान विष्णूला प्रिय असणारी तुळशी, फुले, फळे वहावीत. विष्णू सहस्त्र नाम म्हणावे किंवा ऐकावे. ओम नमो भगवते वासुदेवाय, हा १०८  वेळा जप करावा. त्यानंतर विष्णूची किंवा विठ्ठलाची आरती करावी. पूर्ण दिवस उपास करावा. गरजूंना अन्नदान करावे. दुसर्‍या दिवशी देवपूजा करून उपास सोडावा.