शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आईला नको झालेला, परंतु जगाला हवाहवासा वाटणारा मार्तंड, त्याच्या स्मरणार्थ करतात मार्तंड सप्तमी व्रत!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 18, 2021 12:21 IST

ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात वाचायला मिळते. मार्तंडाप्रमाणे आपणही जन्माला आल्यावर आपल्या गुणांनी जग जिंकून घ्यावे, हा मंत्र आपल्याला या कथेतून मिळतो, म्हणून मार्तंड सप्तमीच्या दिवशी त्याचे स्मरण करावे आणि त्याच्या नावे सूर्याला अर्घ्य द्यावे. 

पौष मासाची सुरुवातच मकर संक्रांतीच्या सणाने होते. सूर्याचे उत्तर दिशेने भ्रमण सुरू होते, म्हणून या संक्रमणाला उत्तरायण असे म्हणतात. या मासात संक्रांती व्यतिरिक्त अन्य उत्सव नसले, तरीदेखील सूर्यपूजेला विशेष महत्त्व दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पौष शुक्ल सप्तमी (१९ जानेवारी) अर्थात मार्तंड सप्तमी या दिवशी `ऊँ मार्तंडाय नम:' असा नामोच्चार करून सूर्याला अर्घ्य द्यायचे असते. 

मार्तंड हे सूर्याचे एक नाव. तसेच या नावाशी निगडित एक पौराणिक कथा सांगितली जाते, की मार्तंड हा ऋग्वेदकालीन अदिती हिचा आठवा मुलगा. हा नको असताना  झाला, म्हणून गर्भावस्थेत तिने त्याचा त्याग केला. मात्र मृत गर्भातूनही त्याचा जन्म झाला. अदितीच्या सर्व मुलांप्रमाणे त्यालाही मार्तंड अशी ओळख मिळाली. त्याने आपल्या कर्तृत्वाने नाव गाजवले आणि लोकप्रियता मिळवली. मातेला नको असताना झालेला, पण त्याच्या गुणांमुळे जगाला हवाहवासा वाटणारा `मार्तंड' हा आदर्शच मानला पाहिजे.  ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात वाचायला मिळते. मार्तंडाप्रमाणे आपणही जन्माला आल्यावर आपल्या गुणांनी जग जिंकून घ्यावे, हा मंत्र आपल्याला या कथेतून मिळतो, म्हणून मार्तंड सप्तमीच्या दिवशी त्याचे स्मरण करावे आणि त्याच्या नावे सूर्याला अर्घ्य द्यावे. 

याच व्रताला उभय सप्तमी असेही म्हणतात. उभय सप्तमी देखील सूर्यपूजेचे महत्त्व सांगते. यात फरक एवढाच की, केवळ पौष शुद्ध सप्तमीला सूर्यपूजा न करता याच महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या सप्तमीलादेखील सूर्यपूजा करणे अभिप्रेत असते.  या दोन्ही तिथींना हे व्रत केले जाते, म्हणून त्या उभय सप्तमी असे नाव दिले आहे.

हिवाळ्याच्या दिवसात संक्रांतीचा सण सर्वार्थाने ऊबदारच म्हणायला हवा. तीळाची स्निग्धता, गुळाचा गोडवा आणि पतंगाच्या निमित्ताने सूर्यस्नान, यामुळे थंडी कुठल्या कुठे पळून जाते. परंतु, ही व्यवस्था एकदिवसीय न राहता, सबंध महिनाभर सूर्याच्या कोवळ्या किरणांशी आपला संपर्क यावा, म्हणून पूर्वजांनी व्रतांच्या निमित्ताने रोज काही ना काही कारणाने सूर्यदर्शन योजले आहे. 

रोज सकाळी उठून सूर्याचे दर्शन घ्या, सूर्यनमस्कार घाला, असे सांगितले, तर लोक उठणार नाहीत. परंतु, कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये अनेक प्रकारचे रोग घालवण्याची क्षमता आहे, असे सांगितले, तर नक्की सूर्यदर्शन घेतील. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे, ही भारतीय संस्कृती आहे. अर्घ्य देण्याची क्रिया सूर्यासाठी असली, तरी त्याचे फायदे आपल्यालाच असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच रोज सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीर लवचिक आणि निरोगी राहते व दीर्घायुष्य लाभते. 

रोज न थकता हजर राहणारा, कोणातही भेदाभेद न करता सर्वांना समान प्रकाश देणारा, अंधाराला पराजित करून उजेडाचे साम्राज्य पसरवणारा, एकटाच असूनही तेजस्वीपणे तळपत राहणारा सूर्य हा केवळ ग्रह नाही, तर सकल सृष्टीचा पोशिंदा आणि आदर्श आहे. त्याच्या दर्शनाने आपल्या दिवसाची सुरुवात व्हावी, यासाठी सूर्याचे प्रात:दर्शन घेण्याचे पूर्वापार संकेत आहेत.

हेही वाचा : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पौष शुक्ल षष्ठीला करतात, 'हे' सुगंधी व्रत!