शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

सोमवती अमावास्या: इच्छा आहे, पण व्रत शक्य नाही? ५ मिनिटांत ‘शिव मानस पूजा’ करा, पुण्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:05 IST

Margashirsha Somvati Amavasya December 2024: आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्युलमुळे अनेकांना इच्छा असूनही शिवपूजन करणे शक्य होत नाही. अशावेळेस मानस पूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय ठरतो. जाणून घ्या, सविस्तर...

Margashirsha Somvati Amavasya December 2024: अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे. ३० डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष अमावास्या आहे. सन २०२४ मधील हे शेवटचे व्रताचरण आहे. तसेच २०२४ मधील शेवटची अमावास्या आहे. इच्छा असूनही शिवपूजन, व्रताचरण करणे शक्य नसेल, तर चिंता करू नका. पाच मिनिटांत होणारी शिवमानस पूजा करा.

या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्युलमुळे अनेकांना मनात असले तरी शिवपूजन, व्रत करता येत नाही. अनेक व्यवधानांमुळे ते शक्य होतेच असे नाही. धावपळीच्या जीवनात परमार्थ, पूजापाठ करायला अनेकांना वेळ मिळत नाही. अशावेळेस मानस पूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय आहे. 

मानस पूजा म्हणजे काय?

मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानस पूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्ट देवताचे स्वरुप आपल्या मन:पटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे, म्हणजे मानसपूजा. अशी पूजा करणे सोपे नाही. त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी, असे सांगितले जाते. 

मानस पूजा कशी करावी?

आपण जेव्हा मूर्तीची पूजा करतो, तेव्हा षोडोपचारे पूजा करतो, म्हणजे आसन, अर्ध्य, पुष्प, गंध, धूप, दिप असे सोळा उपचार पूजा करताना वापरतो. मानसपूजेत खऱ्या वस्तू न वापरता प्रतीके वापरली जातात.  आदि शंकराचार्य यांचे ‘शिव मानस पूजा’ स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्यात भगवान शंकराची मानस पूजा केली आहे. 

शिव मानस पूजा स्तोत्र 

रत्नै: कल्पितमासनं हिम-जलै: स्नानं च दिव्याम्बरंनाना-रत्न-विभूषितं मृगमदामोदांकितं चन्दनं ।जाती-चम्पक-बिल्व-पत्र-रचितं पुष्पं च धूपं तथा,दीपं देव दयानिधे पशुपते हृत-कल्पितं गृह्यताम् ||१||

सौवर्णे नव-रत्न-खंड-रचिते पात्रे घृतं पायसं,भक्ष्यं पञ्च-विधं पयो-दधि-युतं रम्भाफलं पानकं ।शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूर-खंडोज्ज्वलं ,ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ! ||२||

छत्रं चामरयो:युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं ,वीणा-भेरि-मृदंग-काहलकला गीतं च नृत्यं तथा ।साष्ट-अंगं प्रणति: स्तुति: बहुविधा ह्येतत्समस्तं मया,संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ! ||३||

आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं ,पूजा ते विषयोपभोग-रचना निद्रा समाधि-स्थिति: ।संचार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्रानि सर्वागिरो ,यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं  ||४||

कर-चरण-कृतं वाक्कायजं कर्मजं वा,श्रवण-नयनजं वा मानसं वापराधं ।विहितमविहितं वा सर्वमेतत्-क्षमस्व ,जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ! ||५ ||

संस्कृतमध्ये म्हणणे शक्य नाही? मराठीत शिव मानस पूजा म्हणा

श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानससिंहासनीमनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुखशीतल पाणीदिव्य वस्त्र मग वेढून घ्यावे संध्यारंगासम झळझळतेकस्तुरीचंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्व नाहतेपापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांचीकितीक सुंदर अर्धोन्मीलित फुले जाईची अन चाफ्याचीस्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||१||

सुवर्णपात्रही मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटीदह्यादुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुजसाठीरसाळ भाज्या मधूर पाणी गोड फळे स्वामी सेवावीभोजनोत्तरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुखशुद्धी व्हावीमानसीच्या विश्रामगृही प्रभू आता तव होऊ दे आगमन ||२||

मस्तकी धरतो छत्र सुलक्षण चवरीने तुज वारा घालीनस्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरतीस्वर वीणेचे ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरतीपुन:पुन: तुज नमितो येथे स्तवनांनी लववितो वैखरीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||३||

तू आत्मा मम , बुद्धीरुपाने देवी उमा अंतरी विराजेप्राण तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझेच साजेविषयभोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती तीनिद्रा जी भरते नयनांतून सहजसुखाची समाधिस्थितीपायांना जी घडे भ्रमंती तुझी कृपाळा ती प्रदक्षिणावाचेला स्फुरते जी भाषा तुझे स्तवन हे हे दयाघनाया देहातून या मनामध्ये तुझीच लीला तुझीच सत्ता ||४||

मी जे कर्म करावे ते ते तव आराधन हो प्रभुनाथाया हातांनी , या चरणांनी , या वाणीने , या कर्णांनीया कायेने अनुचित कर्मे जी आचरिली पूर्ण जीवनीहे करुणाकर ! महादेव हे ! अपराधांना प्रभू क्षमा करीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||५ ||

||ॐ नमः शिवाय||

|| हर हर महादेव ||

 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक