शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सोमवती अमावास्या: दुप्पट पुण्य मिळेल, लाभच लाभ होईल; शिवस्तुतीसह ३ मंत्रांचा १०८ वेळा जप करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:28 IST

Margashirsha Somvati Amavasya December 2024: तीन प्रभावी मंत्र कोणते? सोमवती अमावास्येला शिवस्तुती आवर्जून म्हणा.

Margashirsha Somvati Amavasya December 2024: ३० डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष अमावास्या आहे. सन २०२४ मधील हे शेवटचे व्रताचरण आहे. तसेच २०२४ मधील शेवटची अमावास्या आहे. अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. शिवपूजनानंतर ३ मंत्रांचा १०८ वेळा जप आणि शिवस्तुती म्हटल्यास दुप्पट पुण्य मिळून, महादेवांच्या शुभाशिर्वादासह अनेकविध लाभ होऊ शकतात, असे म्हटले जाते.

वास्तविक पाहता, महादेव शिवशंकर हे हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत, कुलदेवता आहेत. लाखो घरांमध्ये नित्यनेमाने दररोज शिवमंत्र, श्लोक, स्तोत्रे म्हटली जातात. शिवसंबंधीत रचनांचे पठण, श्रवण केले जाते. मात्र, काही मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे जप, पठण किंवा श्रवण करणे शुभ पुण्यदायी मानले जाते. सोमवती अमावास्येला मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत. 

।। ॐ नमः शिवाय।।

पूजाविधी झाल्यानंतर ।। ॐ नमः शिवाय।। या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी.

शिवाचा गायत्री मंत्र

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात।

महादेव शिवशंकराचा गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी असल्याची मान्यता आहे. शिवपुराणात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. महाशिवरात्रीला महादेवाच्या गायत्री मंत्राचे केलेले पठण शुभलाभदायक मानले जाते. या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. मात्र, १०८ वेळा शक्य नसेल, तर यथाशक्ती मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. 

महामृत्यूंजय मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।

महादेव शिवनाथांचा महामृत्यूंजय मंत्र अतिशय फलदायी असल्याचे सांगितले जाते. किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती या मंत्राचा जप करावा. 

श्री शिवस्तुति

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥

रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २॥

जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३॥

वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४॥

उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।दयानिधी जो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।गंगा शिरीं दोश्ह महाविदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६॥

कर्पूरगौरीं गिरिजा विराजे । हळाहळे कंठ निळाचि साजे ।दारिद्र्यदुःखें स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७॥

स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देवचूडामणि कोण आहे ।उदासमूर्तीं जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८॥

भूतादिनाथ अरिअंतकाचा । तो स्वामि माझा  ध्वज शांभवाचा ।राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९॥

नंदी हराचा हर नंदिकेश । श्री विश्वनाथ म्हणती सुरेश ।सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १०॥

भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ।तो रुद्र विश्वंभर दक्श मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११॥

इच्च्हा हराची जग हें विशाळ । पाळी रचीतो करि ब्रह्मगोळ ।उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२॥

भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदीं वहाती हरीच्या ।मंदाकिनी मंगल मोक्शकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४॥

कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैवल्यदाता मनुजां कळेना ।एकाग्रनाथ विश्ह अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५॥

सर्वांतरीं व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।अंकीं उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६॥

सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशि कोटिभानू ।गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसांवा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।अंतीं स्वहीत सुचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८॥

विराम काळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९॥

सुखावसाने सकळें सुखाचीं । दुःखावसाने टळती जगाचीं ।देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २०॥

अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय ।कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥

शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे ।भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३॥

जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंच तुटली उपाधी ।शुद्धस्वरें गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४॥

निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगें शिव ज्योतिलिंग ।गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।काशीपुरीं भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६॥

जाई जुई चंपक पुश्ह्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ।प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७॥

अलक्श्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।नेई सुपंथें भवपैलतीरीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।पंचाक्शरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९॥

एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्यनामीं ।शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३०॥

शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊं नको ।योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ॥

काळाचें भय मानसीं धरुं नको दुश्ह्टांस शंकूं नको ।ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥

॥ हर हर महादेव ॥ 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक