शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'मन करा रे प्रसन्न', पण कसे? हे सांगणार आहेत डॉ. राजीमवाले लोकमत भक्तीच्या live चर्चासत्रात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 11:03 IST

हे चर्चासत्र मन लावून ऐकायला अजिबात विसरू नका, १८ एप्रिल रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर. 

कोणतेही काम मन लावून करा, मन सांगेल तेच ऐका, मनात जे असेल ते नक्कीच होईल अशा न दिसणाऱ्या मनावर आपण कितीतरी अवलंबून आहोत. पण या मनाचा ठावठिकाणा शोधावा म्हटले, तर ते जागेवर नसतेच. अशा चंचल मनाला एका जागी कसे ठेवावे आणि आणि मनाला मंदिराचा गाभारा कसे बनवावे, याचे मार्गदर्शन करणार आहेत, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले. १८ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता अभिनेत्री अर्चना निपाणकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. 

अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.

तर हे चर्चासत्र मन लावून ऐकायला अजिबात विसरू नका, १८ एप्रिल रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर.