शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मनुष्य वयाने नाही पण अनुभवाने समृद्ध असायला हवा, तरच त्याला आयुष्याची गंमत कळते!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 20, 2021 08:00 IST

आयुष्य समजून घेताना अशी सुमधुर काव्ये प्रश्नांची सहजतेने उकल करतात.

'तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत!' असे म्हणत दटावणाऱ्या मंडळींकडून अनियमित आणि वारंवार पडणाऱ्या पावसाने हा हक्कच जणू काढून घेतलाय. गमतीचा भाग सोडा, परंतु खरोखरच चार पावसाळे जास्त पाहिलेली, वयाने ज्येष्ठ असलेली व्यक्ती अनुभवाने आणि विचारानेसुद्धा तेवढीच समृद्ध असते का हो? नाही, तसा दावा करणे चुकीचे ठरेल. कारण तसे असते तर १०४ वर्षांचे चांगदेव १६ वर्षांच्या ज्ञानेश्वर माउलींसमोर नतमस्तक झाले नसते. म्हणजेच वयाने शहाणपण येतेच असे नाही, तर शहाणपण अनुभवाने येते. मग ते विचारातून प्रगट होते. दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता ज्याच्याकडे जास्त, ती व्यक्ती सर्वात जास्त अनुभवी, अशी आपण ढोबळ व्याख्या करू शकतो. जगाची भ्रमंती केली म्हणून कोणी विचाराने समृद्ध होत नसतो, जग फिरूनही लोकांचा दुस्वास करणारी कोत्या मनाची मंडळी पाहिली, की त्यांच्या मोठेपणाचा मुखवटा गळून पडतो. मग अनुभवी म्हणावे तरी कोणाला? कोणाचे शब्द प्रमाण मानावेत? कोणाचे मार्गदर्शन घ्यावे? कोणाकडून आयुष्य समजून घ्यावे? या प्रश्नांची उकल कवी बा. भ. बोरकर यांनी आपल्या कवितेतून केली आहे. 

मीपण ज्यांचे पक्‍व फळापरीसहजपणाने गळले होजीवन त्यांना कळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे,गेले तेथे मिळले होचराचरांचे हो‍उनि जीवनस्‍नेहासम पाजळले होजीवन त्यांना कळले हो

सिंधूसम हृदयांत जयांच्यारस सगळे आकळले होआपत्काली अन्‌ दीनांवरघन हो‍उनि जे वळले होजीवन त्यांना कळले हो दूरित जयांच्या दर्शनमात्रेमोहित हो‍ऊन जळले होपुण्य जयांच्या उजवाडानेफुलले अन्‌ परिमळले होजीवन त्यांना कळले हो

आत्मदळाने नक्षत्रांचे वैभवज्यांनी तुळिले होसायासाविण ब्रह्म सनातनउरींच ज्यां आढळले होजीवन त्यांना कळले हो