शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

Makarsankranti 2021 : पूर्वी मकरसंक्रांतीला गुप्तदान केले जात असे, कसे ते पहा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 9, 2021 11:55 IST

Makarsankranti 2021: खरे पाहता दान हे नेहमीच गुप्त पद्धतीनेच केले पाहिजे. धर्मशास्त्रानुसार जाहीरपणे केलेल्या दानातून पुण्य मिळते, परंतु ते दान ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. कारण त्याला 'मी'पणाचा अहंकार चिकटतो आणि जिथे मी असतो, तिथे भगवंत कधीच सहभागी होत नाही. 

ठळक मुद्देदान करण्यासाठी पैशांची नाही, तर मनाची श्रीमंती लागते.दान केवळ आर्थिक नाही, तर श्रमदान, रक्तदान, अन्नदान, अवयवदान अशा विविध मार्गांचा अवलंब आपल्याला करता येईल.

ज्योत्स्ना गाडगीळ 

मकर संक्रांतीला तीळाचा लाडू देऊन आपण आप्त-स्नेह्यांना `तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला' अशी प्रेमळ विनवणी करतो. ही प्रथा फार पूर्वीपासून आहे. काही कारणांनी दुरावलेले संबंध या निमित्ताने पुनश्च जोडले जावेत, नात्यात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा उतरावा हा त्यामागचा आशय. 

या प्रथेबरोबरच संक्रांतीला आणखी एक प्रथा होती, ती म्हणजे गुप्तदानाची! गुप्तदानाचा मार्ग कोणता? तर तीळगुळाचे लाडू.  हो! तीळाच्या लाडवात बंदा रुपया लपवून ते लाडू गोरगरीबांना, ब्राह्मणांना, मंदिरातील पुजाऱ्यांना अथवा सेवकवर्गाला दान दिले जात असत. 

आपण म्हणू, आर्थिक मदत करायची होती, तर अशा स्वरूपात का? लाडू खायचे, की बंदे रुपये! ते यासाठी, कारण घेणाऱ्याला अनपेक्षित लाभ झाल्याचा आनंद मिळावा आणि देणाऱ्यालाही दानाचे समाधान लाभावे, यासाठी ही शक्कल लढवली जात असे. 

हेही वाचा : Makarsankranti 2021: उत्तरायणात मृत्यू यावा, अशी हिंदू करतात प्रार्थना; भीष्माचार्यांनीदेखील उत्तरायणात सोडले होते प्राण!

दानापेक्षा गुप्तदानाला महत्त्व अधिक असते. खरे पाहता दान हे नेहमीच गुप्त पद्धतीनेच केले पाहिजे. मात्र, अलीकडच्या काळात दानधर्माचा गाजावाजा केला जातो. देवस्थानांना, संस्थानांना, शाळांना दान केल्यावर तिथल्या भिंतींवर, पंख्यांवर, खुच्र्यांवर नाव कोरले जाते.  तर नवीन पद्धतीनुसार सेल्फी काढून समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवली जाते. परंतु, धर्मशास्त्रानुसार अशा प्रकारे केलेल्या दानातून पुण्य मिळते, परंतु ते दान ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. कारण त्याला 'मी'पणाचा अहंकार चिकटतो आणि जिथे मी असतो, तिथे भगवंत कधीच सहभागी होत नाही. 

दान असे असावे, की या हाताचे त्या हातालाही कळता कामा नये, एवढी गोपनियता दानात असायला हवी. तरच घेणाऱ्याला कमीपणा वाटत नाही आणि देणाऱ्याला अहंकार चिकटत नाही. म्हणून, पूर्वी सण उत्सवाच्या निमित्ताने दानधर्म केले जात असत. तेही गुप्तसुप्त स्वरूपात. संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळातून बंदे पैसे देणे, ही देखील तशीच एक सुंदर प्रथा! 

आजच्या काळातही असे गुप्तदान करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. विप्रो कंपनीचे मालक अझीम प्रेमजी दर दिवशी बावीस कोटींचे दान करतात. एचसीएलचे मालक शिव नादर, रिलायन्सचे मुकेश अंबानी, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम, फ्लिपकार्टचे मालक आणि भारतातील तरुण दानशूर बिन्नी बन्सल, टाटा समूहाचे मालक रतन टाटा, लेखिका रोहिणी निलकेणी यांचीही नावे भारतातील प्रमुख दानशूर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केली आहेत. कोव्हीड काळातही अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दान करून समाजसेवेला हातभार लावला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, हिंदी सिने अभिनेता सोनू सूद यांचे नाव आवर्जून घेता येईल. 

दानाची भाषा श्रीमंतांना शोभते असे म्हणणे चुकीचे ठरेल. दान करण्यासाठी पैशांची नाही, तर मनाची श्रीमंती लागते. आपल्या घासातला घास काढून देण्यासाठी मनाचे औदार्य असावे लागते. दान कोणीही करू शकते, अगदी आपणही! दान केवळ आर्थिक नाही, तर श्रमदान, रक्तदान, अन्नदान, अवयवदान अशा विविध मार्गांचा अवलंब आपल्याला करता येईल. फक्त त्याला मी पणाचा लवलेश नसावा, तरच ते दान ईश्वरचरणी पोहोचू शकेल.

हेही वाचा : Makarsankranti 2021: संक्रांती म्हणजे संघ क्रांती, सम्यक क्रांती, संग क्रांती - प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीRatan Tataरतन टाटाMukesh Ambaniमुकेश अंबानीAzim Premjiअझिम प्रेमजी