शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Makarsankranti 2021: मकर संक्रांत विशेष हलव्याच्या दागिन्यांची परंपरा आणि त्याला आधुनिकतेची जोड!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 13, 2021 14:56 IST

Makarsankranti 2021: मुलींची वाढती हौस पाहता हलव्याच्या दागिन्यांमध्ये आता हलव्याची सजावट केलेली साडी, हेअरक्लिप, चप्पल, पर्स ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच मुंडावळ्या आणि फुलांच्या वाडीप्रमाणे हलव्याची वाडीही विक्रीस ठेवण्यात आली आहे. तर, जावयांना त्यांच्या व्यवसायाप्रमाणे भेट देण्यासाठी- लेखकाला हलव्याचे पेन, वैमानिकाला हलव्याचे विमान, मोटरमनला हलव्याची ट्रेन असेही पर्याय उपलब्ध केले जातात.

ठळक मुद्देसंक्रांतीला जावयाला ५ प्रकारचा हलवा देण्याची प्रथा आहे. बाजारात ३५हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत.सोन्या-चांदीच्या दागिन्यांत असतात, तसे शेकडो प्रकार आता हलव्याच्या दागिन्यांमध्येही बघायला मिळतात. हलव्याच्या दागिन्यांची हौस आता महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सातासमुद्रापार जाऊन पोहोचली आहे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

सण-उत्सव-हौस-मौज-सजणे-नटणे-मुरडणे-गोड-धोड हे सगळे हॅशटॅग नसून उत्सवाच्या नाना छटा आहेत. याशिवाय उत्सवाला पूर्णत्व नाहीच. मकरसंक्रांतीच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी तीळ गुळ आणि गुळाच्या पोळीच्या जोडीला हलव्याचे दागिने करणे, ही आपली परंपरा आहे. यानिमित्ताने नव दांपत्याचे, सुनेचे, लेकीचे आणि तान्ह्या बाळापासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे कोडकौतुक करणे, हाच त्यामागचा हेतू. 

अलीकडच्या काळात आधुनिक राहणीमान असलेल्या मुला-मुलींनाही ते दागिने घालून मिरवण्यात अजिबात कमीपणा वाटत नाही. कारण, सोन्या-चांदीच्या दागिन्यांत असतात, तसे शेकडो प्रकार आता हलव्याच्या दागिन्यांमध्येही बघायला मिळतात. 

हेही वाचा : Makarsankranti 2021: संक्रांतीला तीळगूळ देणे आणि पतंग उडवणे, यामागील शास्त्रीय आणि धार्मिक कारणे वाचा.

संक्रांतीला जावयाला ५ प्रकारचा हलवा देण्याची प्रथा आहे. बाजारात ३५हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. यात भोपळ्याची बी, टरबुजाची बी, कलिंगडाची बी, चुरमुरे, बडीशेप, काजू, पिस्ता, बदाम, लवंग, वेलची असे अनेक खाण्याच्या हलव्यांचे प्रकार आहेत. तर, दागिन्यांसाठी साबूदाणा, वरई, शेवई, तांदूळ यांवर काटेरी हलवा बनवला जातो. तो हलवा वापरून दागिन्यांसाठी पाना-फुलांचे छान नक्षीकाम केले जाते.

पूर्वी ठसठशीत दागिने घालण्याची पद्धत होती. १९९५ पासून डिझायनर दागिन्यांना मुलींची पसंती मिळू लागली. ग्राहकांची आवड लक्षात घेता दागिन्यातही नवे प्रकार दिसू लागले. कुंदन, टिकल्या, झीक, वेगवेगळ्या प्रकारचे मणी, हलवा यांनी युक्त मंगळसूत्र, ठुशी, हार, नथ, कानातले, वेल, बांगड्या, तोडे, कंठी, चिंचपेटी, गजरा, बाजूबंध तसेच नाजूक नक्षीकाम केलेले हलव्याचे दागिने ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतात. 

पुरुषांसाठी हलव्याच्या माळांनी सजवलेला फेटा, पगडी, हार, अंगठी, भिकबाळी, उपरणे तसेच मोबाईल, पेन, लॅपटॉप यांसह पारंपरिक हलव्याच्या दाण्यांनी सजवलेले श्रीफळ बनवून देतात.

तान्ह्या बाळाचे बोरन्हाण करण्यासाठी `वाळा सेट' बनवला जातो, ज्यात श्रीकृष्णाच्या पेहराव्यासकट, गळ्यातला हार, गजरे, मुकुट, बासरी, मोरपीस असते. तर, छोट्या मुलींसाठी हेअरबँड मुकुट (टियारा), माळ, हेअरपीन, कानातले, बांगड्या ह्यांचा सेट मिळतो. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तऱ्हेतऱ्हेचे दागिने मिळतात. 

मुलींची वाढती हौस पाहता हलव्याच्या दागिन्यांमध्ये आता हलव्याची सजावट केलेली साडी, हेअरक्लिप, चप्पल, पर्स ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच मुंडावळ्या आणि फुलांच्या वाडीप्रमाणे हलव्याची वाडीही विक्रीस ठेवण्यात आली आहे. तर, जावयांना त्यांच्या व्यवसायाप्रमाणे भेट देण्यासाठी- लेखकाला हलव्याचे पेन, वैमानिकाला हलव्याचे विमान, मोटरमनला हलव्याची ट्रेन असेही पर्याय उपलब्ध केले जातात. आता तर बायका तिळवणासाठी जाताना मैत्रीणीच्या सुनेला, जावयाला, बाळाला 'भेट' म्हणूनही हलव्याचे छोटे-मोठे दागिने घेऊन जातात. 

हलव्याच्या दागिन्यांची हौस आता महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सातासमुद्रापार जाऊन पोहोचली आहे. एका सणाने, परंपरेने, संस्कृतीने किती गोष्टी, लोक जोडले जातात, ह्याचे उदाहरण आपल्याला ह्या 'शुभ्र दागिन्यांच्या परंपरेतून' लक्षात आलेच असेल. तर आपणही आनंदाची परंपरा आपल्या घरातूनही रुजू द्या, त्यासाठी तिळगूळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड गोड दिसा!

हेही वाचा : Makarsankranti 2021 : पूर्वी मकरसंक्रांतीला गुप्तदान केले जात असे, कसे ते पहा!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती