शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

Makarsankranti 2021: उत्तरायणात मृत्यू यावा, अशी हिंदू करतात प्रार्थना; भीष्माचार्यांनीदेखील उत्तरायणात सोडले होते प्राण!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 8, 2021 10:42 IST

Makarsankranti 2021: मृत्यू अटळ आहे, तो कधी ना कधी येणार आहे. इहलोकीचा प्रवास संपवून प्रत्येकाला परलोकात जायचे आहे. चांगले, निरोगी, आनंदी, उत्साही आयुष्य जगून शेवटचा प्रवासही चैतन्यमयी प्रकाशाच्या दिशेने व्हावा, हाच उत्तरायणात मृत्यू यावा, यामागील सद्हेतू!

ठळक मुद्देअनेक यातनांनी, आजारांनी, अपघाताने मृत्यू न येता चटकन बोलावणे यावे आणि आत्म्याला पुढील प्रवासासाठी पटकन सद्गती मिळावी, असे वाटणे, यालाच म्हणतात चांगले मरण!उत्तरायणात अंधार कमी कमी होऊ लागतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. म्हणून भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत २८ दिवस शरशय्येवर पडून राहिले. शेवटी उत्तरायणात त्यांनी प्राण सोडले.

ज्योत्स्ना गाडगीळ 

मृत्यू आपल्या हाती नाही, परंतु तो चांगल्या पद्धतीने यावा, अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. विशेषत: हिंदू धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार दक्षिणायनात मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते. म्हणून पितामह भीष्म यांनीदेखील उत्तरायण सुरू होईपर्यंत मृत्यू लांबवला होता. कारण, त्यांना त्यांच्या पुण्याईमुळे इच्छामरणाचा वर मिळाला होता. 

हेही वाचा : Makarsankranti 2021: २०२१ ची मकरसंक्रात महापुण्यदायी ठरणार आहे; कशी, ते जाणून घ्या!

पितामह भीष्मांची शरपंजरी: भीष्माचार्यांना इच्छा असेल, तेव्हाच मरण येईल असा वर मिळाला होता. त्यामुळे युद्धात शिखंडीला पुढे करून अर्जुनाने त्यांच्यावर बाण मारताच ते घायाळ होऊन पडले. त्या वेळी दक्षिणायन होते. अंधाराचे प्राबल्य होते. मात्र उत्तरायणात अंधार कमी कमी होऊ लागतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. म्हणून आपल्याला मृत्यू उत्तरायण सुरू झाल्यानंतरच मिळावा, अशी भीष्माचार्यांनी इच्छा प्रगट केली. त्यांच्या इच्छेप्रमाणे अर्जुनाने बाणांची शय्या तयार केली आणि त्यावर पडलेले भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत २८ दिवस शरशय्येवर पडून राहिले. शेवटी उत्तरायणात त्यांनी प्राण सोडले. यावरून एखादा माणूस बरेच दिवस आजारी असून मरायला टेकला असेल आणि त्याचा प्राण जात नसेल, तर तो शरपंजरी पडला आहे असा शब्दप्रयोग रूढ झाला. 

चांगला मृत्यू यावा, म्हणून प्रार्थना :भीष्माचार्यांसारखे आपण पुण्यवान नाही, त्यामुळे इच्छामरणही आपल्या हाती नाही. तो अधिकार आपल्याला ना प्रकृतीने दिला आहे, ना कायद्याने. परंतु चांगले मरण यावे, यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो. आपण म्हणाल, मरण कधी चांगले असते का? हो! ज्याप्रमाणे चांगल्या घरात जन्म व्हावा, असे आपल्याला वाटते, त्याप्रमाणे अनेक यातनांनी, आजारांनी, अपघाताने मृत्यू न येता चटकन बोलावणे यावे आणि आत्म्याला पुढील प्रवासासाठी पटकन सद्गती मिळावी, असे वाटणे, यालाच म्हणतात चांगले मरण! यासाठी पूर्वीचे लोक रोज देवाकडे प्रार्थना करत,

अनासायेन मरणं, विनादैन्येन जीवनम्देहि मे कृपया कृष्ण, त्वयी भक्तिम् अचंचलाम् 

हे कृष्णा, सोपे मरण दे, जीवनात मला कोणत्याही परस्थितीत दीन अर्थात लाचार बनू देऊ नकोस, तुझ्यावरील भक्ती दृढ राहू दे, एवढेच मला दे कृष्णा, बाकी काही नको!

मृत्यू अटळ आहे, तो कधी ना कधी येणार आहे. इहलोकीचा प्रवास संपवून प्रत्येकाला परलोकात जायचे आहे. तर त्याची तरतूद आपल्याला करून ठेवायला नको का? चांगले, निरोगी, आनंदी, उत्साही आयुष्य जगून शेवटचा प्रवासही चैतन्यमयी प्रकाशाच्या दिशेने व्हावा, हाच उत्तरायणात मृत्यू यावा, यामागील सद्हेतू!

हेही वाचा : Makarsankranti 2021 : मकरसंक्रांतीविशेष खास मराठी पतंगाचा प्रकार, वावडी !

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती