शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

महाशिवरात्री: स्वप्नात महादेवांच्या ‘या’ गोष्टी दिसल्या? शुभ संकेत की आणखी काही? पाहा, अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 19:12 IST

Mahashivratri 2024: तुम्हाला महाशिवरात्रीला शिवाच्या संबंधित गोष्टी स्वप्नात दिसल्यात? जाणून घ्या...

Mahashivratri 2024: माणूस हा आशावादी प्राणी आहे. जीवन जगताना तो विविध प्रकारची स्वप्ने पाहत असतो. काही स्वप्न पूर्ण होतात, तर काही अपूर्ण राहतात. स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे. माणसाला जशी पुरेशी झोप महत्त्वाची असते, तसे स्वप्न पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्ने पाहण्याचे अनेक फायदे असल्याचे सांगितले जाते. तसेच काही गोष्टी स्वप्नात का दिसतात, दिसल्या तर त्याचा अर्थ काय असतो, त्या गोष्टी कोणता संकेत देतात, याचाही कयास लावला जातो. ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. शिवाच्या संबंधित काही गोष्टी स्वप्नात दिसणे, यामागील अर्थ आणि संकेत जाणून घेऊया...

वास्तविक पाहता झोपेतील स्वप्ने अनेकदा आठवतही नाहीत. मात्र, काही स्वप्न अशी असतात की, जी कायम स्मरणात राहतात. मात्र, ध्येय, काहीतरी मिळवण्याची इच्छा, यशापर्यंतचा टप्पा यांसह पाहिलेली स्वप्ने माणसाला प्रगतीशील बनवतात. पुढे नेतात. जीवन समृद्ध करतात. ध्येय हे कर्म करण्याची प्रेरणा देते, तर स्वप्न हे त्याला बळकटी देण्याचे काम करते. स्वप्न पाहण्याचे अनेक फायदे आहेत. स्वप्नांमुळे मनाला उभारी मिळते, सकारात्मकता मिळते, ऊर्जा मिळते, आशावाद कायम जागृत राहतो, प्रेरणा मिळते, मनाला शांतता मिळते, पुढे जाण्याची ऊर्मी मिळते, नवनिर्मितीची कल्पकता स्वप्नातून मिळते. माणूस साहस करतो, धाडस करतो, समृद्ध होतो. महाशिवरात्रीला देवदर्शन, शिवलिंग दर्शन तसेच शिवाशी संबंधित गोष्टी स्वप्नात दिसणे सकारात्मक मानले जाते. 

स्वप्नात शिवलिंगाचे दर्शन झाले?

स्वप्न शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी स्वप्नात शिवलिंग दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. स्वप्नात शिवलिंग पाहणे म्हणजे भगवान शिवाने तुमची पूजा स्वीकारली आहे आणि हे स्वप्न प्रगती आणि कीर्ती प्राप्तीचे लक्षण मानले जाते. जर तुम्ही स्वतः शिवलिंगावर दूध अर्पण करताना पाहिले तर याचा अर्थ भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन आशीर्वाद देत आहेत. मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तसेच तुम्हाला पांढरे शिवलिंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या जीवनात शांती येणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. 

स्वप्नात शिवमंदिराचे दर्शन झाले?

स्वप्नात शिवमंदिराच्या पायऱ्या चढत आहात, असे दिसले तर याचा अर्थ जीवनात सुख-शांती नांदेल आणि आर्थिक सुधाराचे संकेत आहेत. तसेच जर शिवमंदिर पाहत असाल तर याचा अर्थ कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकेल. जर कुटुंबासोबत शिवलिंगाची पूजा करताना दिसले तर तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळेल.

स्वप्नात सर्पदर्शन झाले? 

महाशिवरात्रीला स्वप्नात साप दिसला तर ते खूप शुभ, लाभदायक आणि आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते. महादेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि ते लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, असा हा संकेत मानला जातो. तसेच तुम्ही काम करत असाल आणि एखादा साप तुमच्या मागे धावतानाचे स्वप्न पडले, तर ते शुभ लक्षण मानले जाते. शास्त्रानुसार असे स्वप्न भविष्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक काळ आणेल. कामाचे कौतुक होईल.

‘या’ गोष्टीही दिसल्या?

महाशिवरात्रीला स्वप्नात बेलपत्र किंवा बेलपत्राचे झाड दिसले तर ते शुभ मानले जाते. स्वप्नात बेलपत्र दिसणे म्हणजे तुमची आर्थिक समस्या दूर होणार आहे. तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत, असा संकेत मानला जातो. तसेच स्वप्नात नंदी दिसल्यास ते शुभ स्वप्न मानले जाते. नंदी हे भगवान भोलेनाथांचे वाहन असून त्यांच्याशिवाय शिव परिवार अपूर्ण मानला जातो. स्वप्नात नंदी दिसणे म्हणजे तुम्हाला शिवाचा आशीर्वाद आणि यश मिळणार आहे, असे म्हटले जाते. स्वप्नात रुद्राक्ष दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला असे स्वप्न पडले तर याचा अर्थ तुमच्या जीवनातील त्रास, दूर होणार आहेत. प्रलंबित काम लवकरच पूर्ण होणार आहे, असे सांगितले जाते. महाशिवरात्रीला स्वप्नात शिवलिंगावर अभिषेक करत असाल तर याचा अर्थ भगवान महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील. अशा व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि त्याच्या आयुष्यात आनंद येणार आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीspiritualअध्यात्मिक