शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maha Shivratri 2022 : शिव शंकराप्रमाणे आपल्यालाही तिसरा डोळा आहे, तो कार्यान्वित कसा करावा हे सांगताहेत सद्गुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 09:44 IST

Maha Shivratri 2022: तिसरा डोळा केवळ प्रलय घडवण्यासाठी नाही, तर वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा नाश करण्यासाठी आहे.

शिवरात्र, म्हणजे महिन्यातला चौदावा दिवस आणि अमावस्येच्या आदला दिवस. दर महिन्यात शिवरात्री येते. परंतु माघ मासात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. हा दिवस भगवान शंकरांच्या पूजेला समर्पित केला आहे. महाशिवरात्रीला दिवसभर उपास आणि रात्री जागरण या गोष्टीला महत्त्व दिले जाते.  त्या उपासनेमुळे आपणही आपल्या ठायी असलेला त्रिनेत्र उघडू शकतो, कसा ते जाणून घ्या. 

सद्गुरु सांगतात, उपासना करायची तर सुरुवात उपासाने करायला हवी. उपास कशाचा? तर ज्या गोष्टींमध्ये मन अडकलेले असते, अशा सर्व गोष्टींचा उपास. त्यातल्या त्यात आहारात आपले मन जास्त अडकलेले असते. भूकेवर नियंत्रण ठेवले, तर मन आहारात गुंतून राहत नाही. पोट रिकामे असले, की बुद्धी जड होत नाही. अन्य विचारांना चालना मिळते. ऐहिक सुखात गुंतलेले मन बाहेर पडून पारमार्थिक सुखाकडे झेपावते. म्हणून सुरुवात उपासाने. 

उपासाला उपासनेची जोड देण्यासाठी स्तोत्र, मंत्र, जप अशा धार्मिक गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे देहाबरोबर मन विधींमध्ये गुंतून राहते आणि अन्य विचार डोक्यात शिरकाव करत नाहीत. म्हणून उपास, पूजा आणि विधी यांना महत्त्व आहे. 

परंतु जागरण का? कारण महाशिवरात्री हा उत्सव मुळात रात्रीचा आहे. भगवान शिवशंकर हा स्मशानात राहणारा, संसारात असूनही वैरागी वृत्तीचा, हलाहल पचवूनही समाधी अवस्थेत रमणारा देव आहे. त्याला दिवसाच्या कोलाहलापेक्षा रात्र प्रिय आहे. रात्रीच्या शांत वेळी जग झोपलेले असताना तो जागा असतो. जागे राहणे म्हणजे नुसते न झोपणे असे नाही, तर तो जागृत असतो, सावध असतो. महाशिवरात्रीचा उत्सव जागरणाच्या उपचारातून जागृत व्हा असा संदेश देतो. 

शिवशंकराला तीन डोळे आहेत असे आपण म्हणतो. पैकी तिसरा डोळा उघडला, तर प्रलय येईल असेही आपण ऐकले आहे. हा तिसरा डोळा केवळ प्रलय घडवण्यासाठी नाही, तर वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा नाश करण्यासाठी आहे. तो केवळ शिवशंकराला नाही, तर आपल्या सर्वांना अदृश्य स्वरूपात आहे. शिवरात्रीच्या रात्री जागरण कराल, तेव्हा त्या तिसऱ्या डोळ्याने स्वत:च्या आयुष्यात डोकावून पहा. वाईट विकारांवर तृतीय नेत्रातून प्रहार करा. विकारी आणि अतिविचारी मनावर आवर घाला. 

शिवरात्रीची रात्र ध्यानधारणेची असून आपल्या हृदयात स्थित जीव आणि शिवाची सांगड घालून देणारी असते. तो अनुभव जरूर घ्या. दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप डोकावून झाले, आता थोडे स्वत:च्या आयुष्यात डोकावून पहा. हा तिसरा डोळा तुम्हाला कायमस्वरूपी जागे करील. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री