शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
2
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
3
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
4
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
5
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
6
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
7
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
8
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
9
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
10
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
11
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
12
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
13
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
14
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
15
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
16
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
17
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
18
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
19
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
20
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

Maghi Ganeshotsav 2025: गणेश पुराणानुसार कलियुगातही बाप्पा अवतार घेणार; कधी ते पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:43 IST

Maghi Ganeshotsav 2025: १ फेब्रुवारी रोजी आपण माघी गणेश जन्म साजरा करणार आहोत, त्याबरोबरच कलियुगात बाप्पा अवतार कधी घेणार तेही जाणून घेऊ!

यंदा १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती (Maghi Ganeshotsav 2025)आहे. आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा! त्याला आपण अनेक नावांनी ओळखतो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन अशी १२ नावे आहेत. त्याच्या प्रत्येक नावामागे एक आख्यायिका आहे. इथे आपण त्याच्या जन्मकथांबद्दल जाणून घेऊया. तसेच गणेश पुराणात कलियुगातील गणेश अवताराबद्द्दल केलेले भाष्य जाणून घेऊया. 

सत्ययुग:  सत्यायुगात कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती यांच्या उदरी बाप्पाने महोत्कट विनायक या नावाने जन्म घेतला. तोच आपण माघी गणेशोत्सव या नावे उत्सव साजरा करतो. या अवतारात, बाप्पाने देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध केला, धर्म स्थापित केला आणि अवतार संपविला. या युगात गणेशाचे वाहन सिंह होते

त्रेता युग:  त्रेता युगात, गणपतीचा जन्म भद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला. त्याचे नाव गुणेश ठेवले गेले. त्रेता युगात त्याचे वाहन मयूर होते, म्हणून त्याला मयुरेश्वर अशी ओळख मिळाली. या अवतारात, बाप्पाने सिंधू नावाच्या राक्षसाचा नाश केला आणि ब्रह्मदेव कन्या, सिद्धि आणि रिद्धी यांच्याशी लग्न केले.

द्वापर युग:  द्वापर युगात बाप्पाचे सिंदूर चर्चित रूप होते. या अवतारात त्याने सिंदुरासुरचा वध केला आणि त्याने कैद केलेल्या अनेक राजांना आणि वीरांना सोडवले. असे म्हणतात, की पराशर ऋषींच्या आश्रमात बाप्पा लहानाचा मोठा झाला आणि त्यांच्याकडून त्याने १४ विद्या ६४ कला शिकून घेतल्या. तसेच गजमुख नामक दैत्याचा वध केला व त्याचे नाव धारण करून भक्ताचा उद्धार केला.

कलियुग : त्यानंतर येते कलियुग! वरील तिन्ही युगांमध्ये बाप्पा भक्तांच्या रक्षणार्थ धावून गेला. कलियुगात भक्त बाप्पाला आग्रहाने घरी बोलावू लागला. बाप्पा त्याच्या विनंतीला भूलुन आलासुद्धा! लोकमान्य टिळकांनी सामाजिक गरज लक्षात घेता बाप्पाचा उत्सव सार्वजनिक केला. मंडपाच्या व्यासपीठावरून व्याख्यान, गाणी, समाजभान, समाजप्रबोधन इ. उपक्रम चालत असत. परंतु, अलीकडच्या काळात गणेशोत्सवाचे होणारे डीजेमय बीभत्स रूप पाहता, कलियुगात बाप्पा अवतार घेईल याची शाश्वती वाटत नाही. 

तरीदेखील गणेश पुराणात उल्लेख केल्यानुसार कलियुगात बाप्पा धूम्रकेतु या नावे अवतार घेणार आहेत. आधीच्या तीन युगात बाप्पाने आपले वचन पूर्ण केले त्याअर्थी कलियुगातही बाप्पा अवतार घेतील आणि सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतील अशी आशा बाळगूया. बाप्पा मोरया!

टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024ganpatiगणपती 2024