शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

माघ सोमप्रदोष व्रत: मनोकामना, इच्छा होतील पूर्ण, महादेव होतील प्रसन्न; ‘असे’ करा व्रताचरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:35 IST

Magh Som Pradosh Vrat 2025 In Marathi: प्रदोष व्रत सोमवारी येणे शुभ मानले जात असून, या दिवशी केलेल्या शिवपूजनाने पुण्यफलाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Magh Som Pradosh Vrat 2025: इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अतिशय पुण्यफलदायी व्रते, सण साजरे केले जातात. माघ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. १४४ वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे. सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्यातील सोम प्रदोष व्रत आहे. सोमवार आणि प्रदोष व्रत महादेव शिवशंकराला समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन, नामस्मरण, शिवमंत्रांचा जप अतिशय लाभदायी मानला जातो. जाणून घेऊया...

सोमवारी सोम प्रदोष: शिव पूजनासह ७ गोष्टी नक्की करा; वास्तुदोष-पितृदोषातून दिलासा मिळवा!

प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. तसेच सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.

सोमप्रदोष व्रत पूजन नेमके कसे करावे?

प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत. 

चंद्राचे कुंडलीतील स्थान मजबूत करण्यासाठी काय करावे?

नवग्रहात चंद्र हा सर्वांत वेगाने गोचर करणार ग्रह मानला जातो. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी चंद्र देवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्या. तसेच चंद्र देवाशी निगडीत वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. चंद्र देवाचा गायत्री मंत्र, प्रभावी मंत्र, नवग्रहातील स्तोत्रातील मंत्र यांचा यथाशक्ती जप करावा. असे केल्याने चंद्र देवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान आणि प्रभाव मजबूत होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते. 

 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक