शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

माघ भौम प्रदोष: मंगळ दोषातून मिळेल दिलासा, ‘असे’ व्रताचरण करा; महादेव-हनुमंत शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:15 IST

Magh Bhaum Pradosh Vrat February 2025: व्रत एक, लाभ तीन; भौम प्रदोषात महादेवांचे पूजन कसे करावे? जाणून घ्या...

Magh Bhaum Pradosh Vrat February 2025: मराठी वर्षांत माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. माघ महिन्यांची सांगता होत आहे. प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी प्रदोष व्रत येत आहे. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी येत असलेल्या प्रदोष व्रताचे आचरण कसे करावे? भौम प्रदोष म्हणजे काय? महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया...

प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. मंगळवारी प्रदोष तिथी असेल, तर त्याला भौम प्रदोष म्हटले जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. शत्रूंपासून बचाव होऊ शकतो. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

भौम प्रदोष दिनी हनुमंतांचे पूजन करा, असीम कृपा मिळवा

भौम व्रत मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे मंगळ दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जमुक्ती मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच शिवाच्या उपासनेमुळे कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होऊ शकतो, प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, मंगळ दोष असेल आणि त्यासंबंधीचे काही उपाय केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जाते. तसेच मंगळवारी प्रदोष असल्याने या दिवशी महादेवांच्या पूजेसह हनुमानाची पूजा, हनुमंतांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. हनुमंतांची उपासनाही मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव, मंगळ दोष यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. 

भौम प्रदोष व्रत कधी करावे? व्रताचे महत्त्व काय?

मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी भौम प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जाते. प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

भौम प्रदोष व्रताचरणात शिवपूजन कसे करावे? 

प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक जण या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. तसेच यासह 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. तसेच धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्। कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्॥, असा नवग्रह स्तोत्रातील मंगळाचा मंत्र आहे. ॐ अंगारकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नो भोम: प्रचोदयात्॥, हा मंगळाचा गायत्री मंत्र आहे, शक्य असेल तर मंगळ ग्रहाच्या या मंत्राचे यथाशक्ती पठण करणे शुभ मानले गेले आहे.

 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक