शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Lucky Signs: पालीच्या दर्शनाने होणारे लाभ वाचून यापुढे तुम्ही 'ईईई' म्हणत नाक मुरडणार नाही हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 12:39 IST

Lucky Signs: पाल पाहून घाण वाटणे स्वाभाविक आहे, पण तिच्या दिसण्याने शुभ अशुभ संकेत मिळतात, सविस्तर जाणून घ्या!

आपल्या सभोवताली असे अनेक जण असतात, जे एकवेळ वाघाला घाबरणार नाहीत पण पालीला घाबरतात. वास्तविक पाल काही करत नाही, मात्र तिला बघूनच अनेकांना घाण वाटते आणि ती कोणत्याही क्षणी आपल्याच अंगावर येऊन पडेल अशी भीती वाटते. कितीही पेस्ट कंट्रोल केले तरी पालीला आपल्या घराचे एंट्री कार्ड मिळतेच आणि ती आपल्या पिळवळींसह घरात सुखेनैव राहते. इथे आपण तिला घराबाहेर घालवण्याच्या उपायांबद्दल बोलणार नाही आहोत तर आपण पालीच्या दिसण्याने होणारे शकुन अपशकुन जाणून घेणार आहोत. 

>>मनात शंकेची पाल चुकचुकणे हा वाकप्रचार आपण बालपणीपासून ऐकत आलो आहोत. पण पालीचे प्रत्यक्ष चुकचुकणे कानावर पडणे शुभ मानले जाते. नव्हे तर घरात लक्ष्मीचे आगमन होणार असे मानले जाते. 

>> छताला चिकटून बसलेली पाल चुकून आपल्या अंगावर पडली, तर तिचे आपल्या उजव्या बाजूला पडणे शुभ तर डाव्या बाजूला पडणे अशुभ मानले जाते. उजव्या हाताला पाल पडल्याने धनवृद्धी होते तर डाव्या हाताला पडल्याने धनहानी होते असे म्हणतात. 

>> आपण झोपेत असताना पोटावर पाल पडली तर पोटाचे विकार उद्भवतात मात्र पायाला पाल स्पर्शून गेली तर दीर्घ काळापासून सुरु असलेले आजार बरे होतात. >> भिंतीवर सरपटणाऱ्या मगरी सदृश्य पाली नेमक्या महत्त्वाच्या कामाला घराबाहेर पडताना दिसल्या तर त्यांचे दर्शन काम यशस्वी होणार असल्याचे द्योतक मानले जाते, तर कामासाठी निघताना पाल अंगावर पडणे अशुभ मानले जाते. 

>> नवीन वास्तू मध्ये प्रवेश केल्यावर एखादी पाल मृतावस्थेत दिसणे अशुभ ठरते. त्या घरात आजारपण येते असे म्हणतात. 

>> तर दोन पालींना भांडताना पाहणे प्रिय जनांचा वियोग होणार असल्याचे संकेत मानले जातात. 

>> दोन पालींचे मिलन होताना पाहणे घरात शुभ कार्य घडणार असल्याचे दर्शवतात. 

अर्थात हे शास्त्र संकेत लोकांनी आपल्या पूर्वानुभवावरून लिहिले आहेत. तुमचा पाल दर्शनाचा अनुभव काय आहे ते सांगायला विसरू नका!