शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:55 IST

सुंदर शरीर, नूतन पत्नी, मेरूपर्वताएवढे धन, दिंगत किर्ती ह्या गोष्टी प्राप्त असूनही जर आपले मन प्रभुपदी नसेल तर, त्याचा काहीच उपयोग नाही.

जीवनात सांसारीक वासना वाढत गेल्या की, संसाराचा मोह सुटत नाही. प्रत्येक जण आपल्या शरीराची, कपड्यांची खूप काळजी घेतात. परंतु मृत्यूनंतरही जे आपल्या सोबत येते त्या मनाच्या काळजीकडे दूर्लक्ष करतात. मरणोत्तर जे सोबत येते त्याची किंमत करायला हवी. शरीर, धनाची चिंता करू नका. मरणानंतर लोक तुमच्या हातातील अंगठीही काढून घेतात. ह्या वास्तवाची जाणीव भारतीय संस्कृतीच्या सर्वधर्म ग्रंथातून... संत जणांच्या प्रबोधनातून व्यक्त करून देण्यात आली आहे. सदाचाराशिवाय मनाची शुध्दी नाही. दूर्लभ मानवी जीवनाचे सार्थक कशात आहे? हे समजून घ्यायला हवे. नाहीतर -‘देह जाईल जाईल । काळ यासी  बा खाईल।ज्यादिवशी जन्म झाला। त्याचदिवशी मृत्यूचा दिनांक सुध्दा निश्चीत झाला आहे. आपण या जगात आलो. जग याचा अर्थच असा आहे की, ज-जन्मास येणे आणि ‘ग’ म्हणजे गमन करणे. सोडलेला श्वास पुन्हा घेता येणे म्हणजे जीवन असून, सोडलेला श्वास पुन्हा घेता न येणे म्हणजे मृत्यू आहे. म्हणूनच तुकोबासारखे संत सांगतात- मृत्यू सातत्याने प्रतिक्षा करीत असतो-‘अजुनी किती आहे अवकाश?देह जै पासुनी झाला। तै पासुनी मृत्यू लागला।जेवी सापें बेडुक धरीला। गिळू लागला लवनिमीषे।। (नाथ भागवत)म्हणून जोपर्यंत ह्या देहात चैतन्य आत्मा आहे तो पर्यतच जीवनाचे सुवर्ण  करण्यासाठी परमार्थ विचाराची उपासना झाली पाहीजे. परमार्थ म्हणजे परम+अर्थ. परम=श्रेष्ठ आणि शरीरं सुरूपं नवीन कलंत्र, धनं मेरूतुल्यम्, यश श्चारू चित्रम।हरेंरंघ्रिपदमें मनश्चेम लग्नं, तत: किम् तत: किम किंतत: किंम।।सुंदर शरीर, नूतन पत्नी, मेरूपर्वताएवढे धन, दिंगत किर्ती ह्या गोष्टी प्राप्त असूनही जर आपले मन प्रभुपदी नसेल तर, त्याचा काहीच उपयोग नाही. कारण अंतकाळी ह्यापैकी कुणीही सोबत येत नाही. श्रीरामकृष्ण शिष्यांना नेहमी म्हणत की, संसार एक समुद्र आहे. जी विद्या भवसागर तरून जाण्यासाठी उपयुक्त आहे ती आध्यात्म विद्याच आहे. विचारवंत म्हणतात. ‘तुझा आणि माझा नाही भरवसा। गर्व कशाला रे भल्या माणसा।मैनावती देवीने पुत्र गोपीचंद्राला, ध्रुवमातेने ध्रुवाला, मदालसेने पुत्राला या दृष्टीने जागृत केले. मदालसा मुलाला म्हणते -‘या देहाचा भरवसा, पुत्रा न धरावा ऐसामाझे माझे म्हणोनिया, बहू दु:खाचा वळसाबहुत ठकविले, मृग जळीच्या आशातृष्णा सोडोनिया, योगी गेले रे वनवासास्मरे त्या हरीहरा, शरण जाई गोविंदा।’प्रबोधनांचा हा विचार ध्यानी घेवूनच जीवनाची वाटचाल चालू द्यावी. जो श्वास घेतला तोच आपला। अधिकार नाही पुढच्यावरती।दिले नियतीने श्वास मोजुनी । एकही न मिळे त्याच्यावरती।।’

- ह.भ.प. डाॅ.ज्ञानेश्वर मिरगे,शेगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक