शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मन शांत नसते तेव्हा काय केले पाहिजे, हे जाणून घेऊया भगवान बुद्धांच्या प्रेरक कथेतून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 09:00 IST

मन अशांत असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात. म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्यावा नंतरच विचारांची तहान भागवावी.

एकदा भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांसमवेत एका गावातून दुसऱ्या गावी प्रवास करत होते. बराच वेळ प्रवास झाल्यावर एका वटवृक्षाच्या छायेत भगवान आपल्या शिष्यांसमवेत बसले आणि एका शिष्याला म्हणाले, `या गावात एक तलाव आहे, तिथून घडाभर पाणी सर्वांसाठी घेऊन ये. खूप तहान लागली आहे.'

शिष्य नम्रपणे उठला. घडा घेऊन तलावाजवळ गेला. तिथे पाहिले, तर गावकरी त्या तलावाचा पुरेपुर वापर करत होते. कोणी तिथे म्हशी धुवत होते, तर बायका कपडे धुवत होत्या. लहान मुले पाण्यात डुंबत होती. इतके अस्वच्छ पाणी भगवान बुद्धांना कसे बरे द्यावे, या विचाराने शिष्य रिकामा घडा घेऊन भगवान बुद्धांजवळ आला आणि झुकलेल्या नजरेने म्हणाला, `भगवान, ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही.'भगवान म्हणाले, `हरकत नाही. तुही दमला असशील. आमच्याबरोबर तुही थोडी विश्रांती कर. मग बघू.' शिष्य पहुडला.

काही वेळाने भगवान बुद्धांना जाग आली. त्यांनी त्या शिष्याला पुन्हा हाक मारली आणि पाणी घेऊन ये म्हणाले.शिष्याला सकाळचेच दृष्य आठवले. परंतु आज्ञेचा भंग कसा करणार, म्हणून तो निमुटपणे घडा घेऊन तलावाजवळ गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय, तलावातले पाणी शुद्ध दिसत होते. सगळा कचरा, गाळ तळाशी जमा झाला होता. ते पाहून शिष्य आश्चर्यचकित झाला. त्याने अलवारपणे घडा पाण्यात बुडवला आणि वरवरचे शुद्ध पाणी भरून तो घेऊन आला.

त्याची कुतुहलमिश्रीत मुद्रा पाहून भगवान हसले व म्हणाले, `मगाशी अनेक लोकांमुळे सगळा कचरा ढवळला जात होता, म्हणून पाणी दुषित दिसत होते. आता तिथे कोणीच नसल्यामुळे पाणी स्थिर झाले असेल आणि गाळ खाली बसला असेल. यावरून मला हेच सुचवायचे होते, जेव्हा आपल्या मनात अनेक विचारांचा कचरा ढवळून निघतो, डोक्यात अनेक शंकांचे काहूर माजते, असंख्य प्रश्न डोके वर काढतात, अशा वेळेस काही काळ शांत राहावे. सगळ्या विचारांचा निचरा झाला, की मन शांत होते आणि योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त होते. मन अशांत असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात. म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्यावा नंतरच विचारांची तहान भागवावी.