शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कशी साजरी केली जाते बुद्ध पौर्णिमा, चला जाणून घेऊया... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 12:54 IST

आजच्या दिवशी बौद्ध धर्मगुरुंकडून सर्व अनुयायांना भगवान बुद्धांनी दिलेल्या शांतिमय जीवनाचे स्मरण करुन दिले जाते आणि त्यांनीही शांततेचा मार्ग अनुसरावा अशी शिकवण दिली जाते. 

असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो. भारत आणि जगात बरीच संयुक्त मंदिरे आहेत जी भगवान बुद्ध आणि विष्णू यांना समर्पित आहेत. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. चला उत्सवाची परंपरा जाणून घेऊया.

१. भगवान बुद्ध यांचा जन्मदिन म्हणून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खीर केली जाते आणि खीर भगवान बुद्धांना अर्पण केली जाते. 

२. आजच्या दिवशी बौद्ध प्रार्थना स्थळ फुलांनी सजवले जाते व बौद्ध प्रार्थनांचे आयोजन केले जाते.

३. सूर्योदयाच्या अगोदर प्रार्थना स्थळांवर सर्व अनुयायी एकत्र जमतात. भजन, वाचन, गायन करून जयंती साजरी करतात. 

४. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर बौद्ध प्रार्थना स्थळांवर बौद्ध ध्वज फडकविला जातो. हा ध्वज निळा, लाल, पांढरा, पिवळा आणि केशरी रंगाचा असतो. लाल आणि निळा रंग आशीर्वादाचा, पांढरा रंग धर्म शुद्धतेचे प्रतीक, केशरी रंग बुद्धिमत्तेचे प्रतीक आणि पिवळा रंग कठीण परिस्थितीतून जगण्याचे प्रतीक मानला जातो. 

५. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी अनेक गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र दान केले जाते. 

६. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काहीजण पक्षी व पिंजऱ्यात कैद असलेल्या प्राण्यांना मुक्त करून हा दिवस साजरा करतात.

७. या दिवशी भगवान बुद्ध यांचे अनुयायी घरात दिवे लावतात आणि घर फुलांनी, दीपमाळांनी सजवले जाते. 

८. जगभरातील बौद्ध अनुयायी आजच्या दिवशी बोधगया येथे जातात आणि प्रार्थना करतात.

९. भगवान बुद्ध यांच्या चरित्राचे त्यांच्या शिकवणुकीचे सामूहिक वाचन, चिंतन करतात. 

१०. आजच्या दिवशी भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून आजच्या दिवशी बोधी वृक्षाचे पूजन केले जाते. 

१२. भगवान बुद्धांचे अनुयायी आजच्या दिवशी मांसाहार व्यर्ज करतात. कारण भगवान बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होते. 

१३. आजच्या दिवशी बौद्ध धर्मगुरुंकडून सर्व अनुयायांना भगवान बुद्धांनी दिलेल्या शांतिमय जीवनाचे स्मरण करुन दिले जाते आणि त्यांनीही शांततेचा मार्ग अनुसरावा अशी शिकवण दिली जाते.