शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या कामाप्रती कर्तव्यनिष्ठ कसे असावे, हे महापुरुषांच्या चरित्रातून शिकावे; वाचा लोकमान्य टिळकांचा प्रसंग!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 15, 2021 08:00 IST

जीवनात प्रतिक्षणी जो विरक्तपणे तटस्थ असतो, तो खरा ब्रह्मचारी व भगवंताचा उत्कृष्ट भक्त होय.

गोष्ट आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनातील. एकदा ते लिखाण करत बसले होते. त्यांच्या वैयक्तिक चिटणीस खोलीच्या दाराशी कुणीतरी थांबल्याचे पाहून उठला. एक मध्यमवयीन स्त्री दारात उभी होती. तिने त्याला टिळकांशी काम असल्याचे सांगितले.  टिळकांनी लिखाण न थांबवता किंवा वर न पाहता त्या बाईंना आत येण्याची परवानगी दिली. 

बाई समोर आल्या व स्वत:ची फिर्याद सांगून, त्याचे वकीलपत्र टिळकांनी स्वीकारावे अशी विनंती करू लागल्या. मान खाली ठेवून लिखाण चालू व तोंडाने त्या बार्इंशी व्यवस्थित बोलणे असा टिळकांचा पवित्रा पंचेचाळीस मिनिटे होता. नंतर बाई निघून गेल्या. चिटणीस मात्र टिळकांच्या वागण्याने चकित झाला. कचेरीची वेळ संपल्यावर त्याने विचारले, `आपण तर त्या बाईंकडे पाहिलेसुद्धा नाही, त्यांचे काम स्वीकारलेत. त्या उद्या आल्या तर तुम्ही त्यांना ओळखणार कसे?'

त्यावर टिळकांनी शांतपणे विचारणा केली, 'काम स्वीकारण्यासाठी व ते उत्कृष्ट रितीने पार पाडण्यासाठी हातातील काम टाकून त्या बाईंकडे पाहण्याची गरज काय? तशी गरज मला वाटत नाही. त्यांना त्यांच्या शब्दावरून मी ओळखू शकतो. ती व्यक्ती स्त्री-पुरुष कोण आहे, याच्याशी माझा संबंध नाही.'

जीवनात प्रतिक्षणी जो विरक्तपणे तटस्थ असतो, तो खरा ब्रह्मचारी व भगवंताचा उत्कृष्ट भक्त होय. समर्थ रामदास स्वामी लिहितात, 

नसे अंतरी काम नाना विकारी,उदासीन जो तापसी ब्रह्मचारी,निवाला मनी लेश नाही तमाचा,जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। श्रीराम।।

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक