शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
3
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
4
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
5
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
6
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
7
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
8
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
9
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
10
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
11
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
13
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
14
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
15
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
16
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
17
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
18
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
19
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
20
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा

Laxmi Puja: लक्ष्मी मातेने घुबडाला आपले वाहन का बनवले असावे, जाणून घ्या वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:33 IST

Laxmi Puja : हिंदू देवीदेवतांनी आपले वाहन म्हणून पशू-पक्ष्यांची निवड केली आहे, अशातच लक्ष्मी मातेचे वाहन होण्याचा मान घुबडाला मिळाला, पण का? जाणून घ्या.

>> समीर सुनिल तुर्की, निसर्ग निरीक्षक, आळंदी 

घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन आहे असे आपण म्हणतो. काही जण म्हणतात त्याच्या दर्शनाने शुभ वार्ता कळतात, धनलाभ होतो, तर काही जण म्हणतात त्याचे दिसणे अशुभ लक्षण असते. मात्र या श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन विचार केला असता घुबडाचे अस्तित्व मानवासाठी लाभदायकच ठरते, म्हणून त्याला अशुभ ठरवण्याची चूक करू नये. त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

रहस्यमय असलेला हा पक्षी स्वतःच्या गुणांनी मात्र आई महालक्ष्मीचं वाहन अगदीच शोभून दिसतो. क्षणात कधी उडून जाईल कळणारही नाही. जशी लक्ष्मी चंचल, तसे तिचे वाहनही चंचल! ह्यांची ऐकण्याची, पाहण्याची आणि आवाज करण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी जास्त असते. या गुणांमुळेच लक्ष्मी मातेने हे वाहन निवडले असावे. 

काही गुण जे आपण शिकले पाहिजेत

●हे कधीही विचलित होत नाही●हे डिवचल्याशिवाय कोणावरही विनाकारण हल्ला करत नाही●हे कोणालाच घाबरत नाही. उलटपक्षी ह्याच्याच हल्ल्यात इतर पक्षी स्वतःची घरटी सोडून घाबरून पळून जातात.. अपवाद फक्त पक्षीराज गरुड.●कोणी जर पाळले तर मालकावरच हल्ला केला आहे असं अपवादात्मक म्हणून सुद्धा उदाहरण सापडत नाही.

>> ज्या प्रमाणे ह्याचं चालणं रुबाबदार आणि शांत त्याचप्रमाणे ह्याचं उडणं सुद्धा अतिशय शांत आणि जबरदस्त असतं.. इतकं की हे उडतांना अजिबातच आवाज करत नाही.

>> ह्याची नजर इतकी तीक्ष्ण आणि भेदक की विचारता सोय नाही.. रात्री पाहण्याची ह्याची विलक्षण क्षमता ही तर ह्याची सर्वात ताकदीची बाजू. 

>> अगदी आरामात कोणत्याही पक्षाच्या घरट्यावर हल्ला करून तिथून आपली शिकार उचलून क्षणार्धात उडून जाणं कोणालाही धस्सं करू शकतं. जर कोणी ह्याला शिकार करतांना पाहिलं असेल किंवा ह्याची शिकार करायची पद्धत माहिती असेल तर मी काय म्हणतोय ते सहज कळेल.

लक्षात ठेवण्यासारखं काही

>> घुबडाचा हल्ला एखाद्या कुत्रं चावल्याएव्हढाच वाईट असू शकतो. कारण तो इतका वेगवान असतो की काय झालंय हे कळायला सुद्धा वेळ लागतो.

>>  घुबडाची पिल्लं कधी जमिनीवर दिसली तर त्यांच्या जास्त जवळ जाऊ नका, वरुन कुठून तरी घुबडं लक्ष ठेवून असतात आणि ती त्यांच्या पिल्ल्यांच्या बाबतीत अत्यंत सजग असल्याने भयानक आक्रमक होऊ शकतात.

>> घुबडाच्या हल्ल्यात माणसं मरत नाहीत, त्यामुळे उगाच जास्त घाबरून त्यांच्यावर प्रतिहल्ला करू नका किंवा त्यांना मारून टाकू नका तर फक्त लवकर दुसरीकडे पळून जा. 

>> आणि हो.. ह्याचा आवाज जरी ऐकू आला तरी उगाच अशुभ अशुभ म्हणून घाबरून जाऊ नका. काही अशुभ नसतं. थोडक्यात काय गैरसमजांपोटी घुबडांना घाबरून जाऊ नका, त्यांच्या शिकारी करू नका.

टॅग्स :Natureनिसर्ग