शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

Kojagiri purnima 2022: कोजागिरीच्या पौर्णिमेच्या रात्री, देवी लक्ष्मी विचारते, 'को जागरति?' जाणून घ्या, कोजागिरीचं महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 07:00 IST

Kojagiri purnima 2022: कोजागरी पौर्णिमा आपण साजरी करतो, पण त्या उत्सवाचं मर्म काय तेही जाणून घेऊ!

अश्विन शुद्ध पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणतात. यंदा ९ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. त्या रात्री लक्ष्मी पूजन करायचे असते व रास-गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते. त्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, `कोण जागे आहे?' जो जागत असेल, त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, हा त्याचा अर्थ नाही. तसे जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे. अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. 

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो. 

चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. ती आपल्याही आयुष्यात यावी, हा चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीचे लोक विंâवा संतवृत्तीचे लोक असतील, तर आपण त्यांच्या सहवासात रमतो. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते. कोजागिरीनिमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हे निमित्त! त्यानिमित्ताने खाण्याचे-गाण्याचे कार्यक्रम रंगतात. चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते. 

लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदुळाने हत्ती रेखाटून त्याला हळद-कुंकू वाहिले जाते. फुले , हार वाहिले जातात. श्रीसुक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते. देवीला आणि चंद्राला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. दुधाच्या जोडीला पोह्यांचा बेत ठेवला जातो. पूजा झाली, की देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते.

अश्विने शुद्धपक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमातद्रात्रौ पूजनं कुर्याच्छ्रियो जागृतिपूर्वकम्निशीये वरदा लक्ष्मी: को जागतीरति भाषिणीजगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनीतस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले।।

‘रांधा, वाढा आणि उष्टी काढा’, या जीवनसूत्रात अडकलेल्या स्त्रियांना या सणांच्या निमित्ताने थोडीशी विश्रांती, मनोरंजन, पोटभर गप्पा आणि खिरापतीची मेजवानी. 

टॅग्स :kojagariकोजागिरी