शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

'विटाळ' या संकल्पनेबद्दल संत चोखामेळा यांचे परखड मत काय होते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 10:41 IST

सुतक-सोहेर, विटाळ हे मानवी देहाला चिकटलेले विकार आहेत, देव निर्लेप आहे, मग त्याला विटाळ होतो का, यावर संतांनी केलेले भाष्य पहा. 

ईश्वर हा नित्य, शुद्ध, मुक्त व आनंददायी असतो. सोवळे ओवळे असते, ते मनुष्याला, ईश्वराला नाही. मात्र, लोकांनीच काही संभ्रम निर्माण करून ठेवले आणि त्यातच अडकून राहिले. अशा लोकांना सोवळ्याओवळ्या पलीकडच्या देवाची ओळख करून देण्यासाठी संत चोखामेळा यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या अमोघ शैलीतून देवाची खरी ओळख करून दिली. 

ते म्हणतात, की हा विटाळ आला तरी कोठून? पूर्वजन्मीच्या कर्मानुसार हा विटाळ वंशपरंपरेने आपणास आला काय? पूर्वजन्मी तरी कर्म करण्याची बुद्धी कोणी दिली? या प्रश्नांचा धागा लांबवताना तो थेट ब्रह्मतत्त्वापर्यंत जाऊन पोहोचतो. या एका तत्त्वापासून सर्व सृष्टीची निर्मिती झाली. मग एक सोवळा व दुसरा ओवळा, असा भेद कसा झाला? एका बीजापासून निर्माण झालेल्या वृक्षास फळे सारखीच गोड येणार. दोन-तीन नासकी निघाली, तर बीजातच दोष आहे, अशी शंका घेणार का?

ही शंका चोखोबांनी बोलून दाखवली आहे. विटाळ असेल, तर तो सर्वांनाच आहे. सोवळा कोण? ओवळा कोण? हे सांगणे अवघड आहे.चोखा म्हणे मज नवल वाटते, विटाळापरते आहे कोण?

सर्वांचा जन्म विटाळातूनच होता, असे त्यांना म्हणायचे आहे. त्यांच्या मते, सोवळ्याओवळ्यापलीकडचा एक विठ्ठल आहे.चोखा म्हणे माझा विठ्ठल सोवळा, अरूपे आगळा विटेवरी।

म्हणून कोणाच्या संगतीने देव विटाळतो व पाण्याने शुद्ध होतो, हे त्यांना मान्य नाही. जो सोवळा आहे, त्यास विठ्ठल सोवळा वाटतो आणि ओवळ्याच्या ठिकाणी तो ओवळा आहे. खरे पाहता देव सोवळ्याओवळ्याच्या पलीकडचा आहे. चोखोबा म्हणतात की-

नीचाचे संगती देवो विटाळला,पाणीये प्रक्षाळोनि सोवळा केला,मुळिच सोवळा कोठे तो गोवळा, पाहत पाहणे डोळा जयापरी,सोवळ्याचे ठाई सोवळा आहे,वोवळ्या ठाई वोवळा का न राहे,चोखा म्हणजे देव दोहाच्या वेगळा,तोचि म्या देखिला दृष्टीभरी।

भगवंताला नियमांच्या चौकटीत न अडकवता, आपणही चौकटीपलीकडचा निर्गुण परमात्मा बघायला शिकले पाहिजे. एवढेच काय, तर संत म्हणतात, चराचरात भगवंताला बघायला शिका, म्हणजे मनातून भेदाभेद दूर होईल आणि परमात्म्याचे स्वरूप नजरेस पडेल. असा सोवळ्या ओवळ्या पलीकडचा देव सर्वांना भेटावा, हीच तळमळ चोखोबांच्या या अभंगातून प्रगट होत आहे. 

आपण जी बंधने किंवा नियम पाळतो ते आपल्या मनाची शुचिर्भूतता व्हावी म्हणून! अंघोळ केल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते तसे भगवंतालाही वाटेल, आपल्याला ऊन, वारा, पावसाचा त्रास होतो, तसा देवालाही होत असेल, आपल्याला भूक लागते तशी देवालाही लागत असेल, हा भोळा भाव ठेवून भक्त आपल्याला आवडते ते देवालाही देतो. आणि देवालाही असा प्रेमळ भक्त आवडतो. कर्मकांड सुद्धा यासाठी की आपले मन त्यात एकाग्र व्हावे. यातले कोणतेही उपचार देवाला प्रसन्न करण्यासाठी नाही, तर देवपूजा करताना आपले मन प्रसन्न राहावे यासाठी आहेत. तुकाराम महाराज लिहितात, 'मन करा रे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण!' जीवाचा प्रवास शिवापर्यंत पोहोचवणारे मनच आहे, देह फक्त माध्यम आहे. पण देह शुद्ध असेल तरच मन शुद्ध राहील. ही शुद्धी केवळ पाण्याने किंवा साबणाने येणारी नाही तर आपले कर्म चांगले हवे, तरच देहशुद्धी आणि मनशुद्धी आपोआप होईल आणि देवाला या देहाचा विटाळ कधीच होणार नाही.