शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उद्या चंपाषष्ठीला खंडोबाचे षडरात्रोत्सव संपेल; तुम्ही या उत्सवाचा कुळाचार केला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:27 IST

महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये खंडोबाचे षडरात्रोत्सव अर्थात खंडोबाचा सहा दिवसाचा उत्सव कुलधर्म कुलाचार म्हणून केला जातो. मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव ...

महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये खंडोबाचे षडरात्रोत्सव अर्थात खंडोबाचा सहा दिवसाचा उत्सव कुलधर्म कुलाचार म्हणून केला जातो. मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव सुरू होऊन चंपाषष्ठीला तो संपतो. या निमित्ताने कोणता कुलाचार केला जातो ते जाणून घेऊ. 

पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला. तेव्हा शंकरानी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपक वनात मणी मल्ल दैत्याचा वध केला. तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्लारी, मल्लारीमार्तंड, खंडोबा, खंडेराय असे नाव पडले. 

पूजेचा विधी : एका ताम्हनामध्ये किंवा ताटामध्ये श्रीफळ, सुपारी, विड्याची पाने, फळे आणि भंडारा ठेवतात. तेथे नजीकच एका कलशावर श्रीफळ ठेवून त्याची पूजा करतात. खंडोबाला आवाहन करतात. त्या कलशात खंडोबाचे तेज अवतरले असे समजून त्याची पूजा करतात. 

नंतर तुपाचे निरांजन लावून ते ताम्हनात ठेवतात व ते ताम्हण कलशाभोवती तीनदा ओवाळतात. मग कलशावरचे श्रीफळ उचलून कपाळाला लावतात. या वेळी सर्व जण 'येळकोट मल्हार- चांगभलं' असे म्हणत खंडोबाची करुणा भाकतात. खंडोबाला नैवेद्य दाखवून दुसरे दिवशी पूजेचे उद्यापन करतात. 

खंडोबाची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत. काही मुसलमान बांधव खंडोबाचे भक्त असतात. ते खंडोबाला मल्लुखान म्हणतात. कर्नाटक, आंध्र वगैरे भागात  मैलार- मैराळ म्हणजेच खंडोबा हे कुलदैवत आहे. मद्रासची उपनगरी मैलापुर हे मैलारचे मूळ गाव होय. 

जेजुरी, निमगाव, पाली पेम्बर, नळदुर्ग, शेंगुड, सातारे, मालेगाव (नांदेड), मैलापुर, मैलारसिंग, देवरगुड्डू, मणमैलार वगैरे खंडोबाची तीर्थक्षेत्रे आहेत. लग्न झालेली नवदाम्पत्ये जेजुरीला किंवा त्यांचे कुलदैवत खंडोबा ज्या गावी असेल त्या गावी जाऊन तळी आरती करतात. हा कुलाचार आहे. त्याला आहेर यात्रा म्हणतात. 

तर आपणही मणी मल्ल दैत्यांचा नाश करणाऱ्या शंकराच्या अवताराला अर्थात खंडोबाला चंपाषष्ठीच्या निमित्ताने स्मरण, पूजन करून भक्तिभावाने बेल भंडारा वाहूया. जय मल्हार!

टॅग्स :Khandoba Yatraखंडोबा यात्रा