शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Karva Chauth 2024: द्रौपदीनेही पांडवांसाठी केले होते करवा चौथ व्रत; वाचा व्रताचे महाभारत कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:14 IST

Karva Chauth 2024: २० ऑक्टोबर रोजी आपल्याकडे संकष्टीचे व्रत असले, तरी उत्तर भारतात ही तिथी करवा चौथ म्हणून ओळखली जाते; जाणून घ्या प्राचीन प्रथेविषयी!

२० ऑक्टोबर रोजी संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024)आहे, त्यानिमित्त आपण बाप्पाची उपासना म्हणून संकष्टीचे व्रत करतो. तसेच आश्विन महिन्यातील ही चतुर्थी अन्य कारणामुळेही महत्त्वाची ठरते, ती म्हणजे करवा चौथ (Karva Chauth 2024) या व्रतामुळे. पतीला दिर्घआयुष्य मिळावे म्हणून आपल्याकडे जसे वटपौर्णिमेचे व्रत आहे, तसे उत्तर भारतीय स्त्रिया हे व्रत करवा चौथ या नावे करतात. दिवसभर उपास आणि रात्री चंद्र दर्शन घेऊन पाणी पिणे आणि फराळ करणे असे या व्रताचे स्वरूप असते. हिंदी चित्रपटात यावर आधारित अनेक दृश्य आपण पाहिली आहेत. त्याबद्दल आपणही अधिक माहिती करून घेऊ आणि या व्रताचा महाभारताशी संबंध कसा आहे तेही जाणून घेऊ. 

करवा चौथ हा शब्द आला कुठून? 

तर त्यामागे आहे एक पौराणिक कथा! करवा नावाची एक पतिव्रता स्त्री नदीवर धुणं करत असताना तिथे एक मगर आली आणि त्या मगरीने तिच्या नवऱ्याला पकडले. तिने हातातले काम सोडून चक्क मगरीचा सामना करत नवऱ्याला वाचवण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तिच्या नवऱ्याला नेण्यासाठी आलेल्या यमदूतांनी तिचे साहस पाहिले आणि यमराजाला ही माहिती दिली. तिच्या पातिव्रत्यासमोर यमराजही झुकले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला मगरमिठीतून सोडवले, तो दिवस होता चतुर्थीचा. दोघांनी मिळून चंद्र दर्शन घेतले आणि चंद्राच्या साक्षीने मिळालेले यश साजरे करण्यासाठी, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करवाने चौथचे अर्थात चतुर्थीचे वर्णन केले. तेव्हापासून अनेक उत्तर भारतीय महिला करवा चतुर्थीचे व्रत करू लागल्या. 

चंद्र दर्शनासाठी चाळणीचा वापर का?

करवा नावाची महिला पतिव्रता होती, आपल्या पतीचे मुख हेच चंद्रापेक्षा अधिक प्रिय मानणारी होती. त्याच्या जीवाचे रक्षण आणि चंद्राप्रती कृतज्ञता हे दोन्ही भाव एकत्रित व्यक्त करण्यासाठी तिने चंद्राच्या कृपेने पतीचे मुख पाहता आले, म्हणून तिने छिद्र असलेल्या चाळणीतून चंद्र दर्शन घेतले आणि नंतर त्याच चाळणीतून पतीचे दर्शन घेत व्रत पूर्ण केले. तेव्हापासून चंद्र दर्शन थेट न घेता चाळणीतून चंद्र दर्शन घेण्याची प्रथा पडली. पतीवर निस्सीम प्रेम असलेल्या या भारतीय महिलेला चंद्र देखील पतीसमोर आकर्षक वाटत नाही, म्हणून त्याच्याकडे ती आडून पाहते आणि नवऱ्याचा मुखचंद्र डोळे भरून पाहते, हा भाव त्या कृतीमागे दडला असावा. 

या व्रताला महाभारताचीही पार्श्वभूमी : 

एकदा पांडवपुत्र अर्जुन निलगिरी पर्वतावर तपस्या करत असताना त्याच्यावर नैसर्गिक संकट आलं. त्याची तपश्चर्या भंग होऊ नये म्हणून महर्षी नारदांच्या सांगण्यावरून द्रौपदीनेदेखील हे व्रत केलं आणि अर्जुनावरचं संकट टळलं. इथेही स्त्रीचं पातिव्रत्य दिसून येतं. एकूणच हे व्रत भावनांशी निगडित आहे हे लक्षात येते. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी