शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
5
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
6
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
7
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
8
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
9
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
10
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
11
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
12
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
13
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
14
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
15
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
16
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
17
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
18
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
19
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
20
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:33 IST

Kartik Maas Som Pradosh Vrat 2025: सोमवारी प्रदोष व्रत येणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. शिवाच्या कृपेचे धनी होण्यासाठी कसे व्रत कराल? जाणून घ्या...

Kartik Maas Som Pradosh Vrat 2025: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्। उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।। अलीकडेच मराठीतील अत्यंत महात्म्य असलेला आणि अनन्य साधारण महत्त्वाचा चातुर्मास काळ समाप्त झाला आहे. कार्तिक महिना सुरू आहे. या कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत सोमवारी येत आहे. महादेव शिवशंकरांना समर्पित असलेले प्रदोष व्रत अत्यंत शुभ फलदायी असल्याचे म्हटले जाते. सोम प्रदोष म्हणजे काय? हे व्रत कसे करावे? जाणून घेऊया...

सोमवार, ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी सोम प्रदोष आहे. प्रदोष दिनी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. 

सोमप्रदोष व्रत करायची सोपी पद्धत  ॥ Som Pradosh Vrat Puja Vidhi

प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असेल तर सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत. 

शंकरांच्या प्रभावी मंत्रांचा यथाशक्ती जप करावा ॥ Som Pradosh Vrat Shiv Mantra

प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. 

सर्वांत वेगाने गोचर करणार ग्रह चंद्र, मंत्र ठरतील रामबाण ॥ Som Pradosh Vrat Chandra Mantra

नवग्रहात चंद्र हा सर्वांत वेगाने गोचर करणार ग्रह मानला जातो. दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्। नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम्॥, हा नवग्रह मंत्रातील चंद्राचा मंत्र आहे. याशिवाय, ॥ ॐ सों सोमाय नम:॥, ॥ ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:॥ हे चंद्राचे प्रभावी मंत्र मानले जातात. ॥ ॐ पद्मद्वाजय विद्महे हेमा रूपाय धीमहि तन्नो चंद्र: प्रचोदयात् ॥, हा चंद्राचा गायत्री मंत्र आहे. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी चंद्र देवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्यात. तसेच चंद्र देवाशी निगडीत वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. चंद्र देवाचा गायत्री मंत्र, प्रभावी मंत्र, नवग्रहातील स्तोत्रातील मंत्र यांचा यथाशक्ती जप करावा. असे केल्याने चंद्र देवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान आणि प्रभाव मजबूत होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते. 

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kartik Som Pradosh Vrat 2025: Shiva's Blessings & Fulfillment Await

Web Summary : Kartik Som Pradosh Vrat on November 3, 2025, is dedicated to Lord Shiva. Observe the fast, worship Shiva during the Pradosh period, chant mantras like 'Om Namah Shivaya,' and offer prayers to Chandra. This strengthens the Moon in your horoscope, fulfilling desires.
टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक