Kartik Sankashti Chaturthi November 2025 Moon Rise Timing: प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्त झाला आहे. यानंतर कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जात आहे.
शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक संकष्ट चतुर्थी आहे. गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो.
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५ ला ‘असे’ करा व्रत
शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०९ वाजल्यापासून ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत राहु काळ आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५ ला चंद्राला अर्घ्य द्या
संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते.
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५ विविध शहरांतील चंद्रोदय वेळ ( Sankashti Chaturthi November 2025 Moonrise Time)
| शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
| मुंबई | रात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे |
| ठाणे | रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे |
| पुणे | रात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे |
| रत्नागिरी | रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे |
| कोल्हापूर | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
| सातारा | रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे |
| नाशिक | रात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे |
| अहिल्यानगर | रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे |
| धुळे | रात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे |
| जळगाव | रात्रौ ०८ वाजून २५ मिनिटे |
| वर्धा | रात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे |
| यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून १६ मिनिटे |
| बीड | रात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे |
| सांगली | रात्रौ ०८ वाजून ३९ मिनिटे |
| सावंतवाडी | रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे |
| सोलापूर | रात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे |
| नागपूर | रात्रौ ०८ वाजून ०९ मिनिटे |
| अमरावती | रात्रौ ०८ वाजून १६ मिनिटे |
| अकोला | रात्रौ ०८ वाजून १९ मिनिटे |
| छत्रपती संभाजीनगर | रात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे |
| भुसावळ | रात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे |
| परभणी | रात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे |
| नांदेड | रात्रौ ०८ वाजून २२ मिनिटे |
| धाराशीव | रात्रौ ०८ वाजून ३० मिनिटे |
| भंडारा | रात्रौ ०८ वाजून ०७ मिनिटे |
| चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून १२ मिनिटे |
| बुलढाणा | रात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे |
| मालवण | रात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे |
| पणजी | रात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे |
| बेळगाव | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
| इंदौर | रात्रौ ०८ वाजून १९ मिनिटे |
| ग्वाल्हेर | रात्रौ ०७ वाजून ५९ मिनिटे |
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
Web Summary : Kartik Sankashti Chaturthi on November 8, 2025, devotees observe a fast and worship Lord Ganesha. The article details the vrat rituals, Rahu Kaal timings, and moonrise times for various cities, emphasizing the importance of moon sighting before breaking the fast.
Web Summary : 8 नवंबर, 2025 को कार्तिक संकष्टी चतुर्थी है, भक्त उपवास रखते हैं और भगवान गणेश की पूजा करते हैं। लेख में व्रत विधि, राहु काल और विभिन्न शहरों के लिए चंद्रोदय का समय बताया गया है, और व्रत तोड़ने से पहले चंद्रमा देखने के महत्व पर जोर दिया गया है।