शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

कार्तिक संकष्ट चतुर्थी: बाप्पा करेल इच्छा पूर्ण, ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 07:07 IST

Kartik Sankashti Chaturthi November 2023: नोव्हेंबर महिन्यातील दुसरी संकष्ट चतुर्थी असून, प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ जाणून घ्या...

Kartik Sankashti Chaturthi November 2023: संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी आल्या आहेत. नोव्हेंबरमधील दुसऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण कसे करावे? कार्तिक वद्य चतुर्थी तिथी आणि प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा जाणून घेऊया...

प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा. उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. 

कार्तिक संकष्ट चतुर्थी: गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२३

कार्तिक संकष्ट चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२ वाजून २४ मिनिटे. 

कार्तिक संकष्ट चतुर्थी समाप्ती: शुक्रवार, ०१ डिसेंबर २०२३ रोजी ०३ वाजून ३१ मिनिटे.

सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र, संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, हे प्रदोष काळी करायचे व्रत आहे. त्यामुळे कार्तिक संकष्ट चतुर्थीचे व्रत गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी होती. तर आता ३० नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. 

संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे
ठाणेरात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे
सातारारात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून २७ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून २२ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून १९ मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ०७ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून १० मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०८ वाजून ३९ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून २६ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ०४ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून १० मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून १४ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता १८ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून १८ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून १६ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ०२ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ०६ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून १८ मिनिटे
मालवणरात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
पणजीरात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
बेळगावरात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०७ वाजून ५४ मिनिटे

 

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३ganpatiगणपती