शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून कार्तिक मासारंभ; जाणून घ्या कार्तिक स्नान तसेच या मासाचे महत्त्व आणि मुख्य सण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 18:18 IST

कार्तिकातील धर्मकृत्यांमध्ये कार्तिकस्नान व दीपदान यांना विशेष महत्त्व आहे. या मासात संपूर्ण महिनाभर पहाटे लवकर उठून केल्या जाणाऱ्या नित्यस्नानाला कार्तिक स्नान म्हणतात. 

चांद्रवर्षातील आठवा व शरद ऋतुतील दुसरा महिना म्हणजे कार्तिक मास. उद्यापासून म्हणजेच ५ नोव्हेंबर पासून कार्तिक मासारंभ होत आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पुढे मागे कृत्तिका नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे या महिन्याला कार्तिक म्हणतात. या मासाला उर्ज, बाहुल, कार्तिकिक अशीही नावे आहेत. या मासातच थंडीची सुरुवात होऊन रुक्ष वारे वाहू लागतात.

कार्तिकातील धर्मकृत्यांमध्ये कार्तिकस्नान व दीपदान यांना विशेष महत्त्व आहे. या मासात संपूर्ण महिनाभर पहाटे लवकर उठून केल्या जाणाऱ्या नित्यस्नानाला कार्तिक स्नान म्हणतात. 

आश्विन शुद्ध दशमी, एकादशी वा पौर्णिमेस स्नानास प्रारंभ करून कार्तिक पौर्णिमेस याची समाप्ती करतात. हे स्नान नदी वा जलाशयात केले जाते. पण शहरांच्या ठीकाणी शक्य नसेल तर घरीच हे व्रत अंगिकारता येते. हे प्रात: स्नान महिनाभर शक्य नसेल तर कार्तिकी शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत पाच दिवस तरी अवश्य करावे. 

कार्तिक मासातील मुख्य सण पाहू : 

१) बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)२) भाऊबीज (यमद्वितीया)३) कार्तिकी एकादशी ४) तुलसीविवाह५) वैकुंठ चतुर्दशी६) ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी

या शिवायही अनेक महत्त्वाचे दिवस, उत्सव, तिथी या मासात येतात. त्यांची माहिती येत्या काळात घेऊच. कोरोना काळानंतर स्थगित झालेली कार्तिक वारी करण्यास सरकारने परवानगी दिली असल्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. असा हा कार्तिक मास ५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत राहणार असून ५ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरू होणार आहे.