शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kamika Ekadashi 2024: एकादशीला तांदूळच काय तर वरी तांदूळसुद्धा खाऊ नये; याचे कारण सापडते विष्णुपुराणात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 11:31 IST

Kamika Ekadashi 2024: एकादशी आणि दुप्पट खाशी असे आपण म्हणतो आणि उपासाच्या नावावर अनेक वातूळ पदार्थ खातो, पण त्याला शास्त्राधार नाही!

>> सचिन मधुकर परांजपे (पालघर)

एकादशीला तांदुळ, किंवा भगर जे वेगळे धान्य असूनही तांदळाचाच प्रकार अनेकजण मानतात. शास्त्रानुसार हे पदार्थ उपासाला चालत नाहीत. त्यामागे काही कथाही सांगितल्या जातात. पुराणातील कथांवर कोणी किती विश्वास ठेवायचा? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एकादशीला भगर (वरीचा तांदूळ/उपासाचा तांदूळ) का खाऊ नये या संदर्भात वाचनात आलेली कथा सांगतो.  

१) विष्णुपुराणातील संदर्भानुसार महर्षी मेधा हे ऋषी देविच्या क्रोधापासून वाचण्यासाठी योगबलाने देहत्याग करुन तो देह जमीनीत एकरुप करतात आणि त्या देहापासूनच तांदूळ निर्माण झाला आहे. एकादशीला मांसाहार वर्ज्य असल्याने त्या दिवशी तांदूळ सेवन करणे हे मांसभक्षण समजले जाते म्हणून एकादशीला तांदुळ आणि तांदळाचे पदार्थ व उपप्रकार समजला जाणारा वरी तांदूळ किंवा भगर वर्ज्य आहे. 

२) तांदुळ किंवा भात हे हविषान्न आहे म्हणजे ते यज्ञामार्फत देवास अर्पण केले जाते म्हणून ते एकादशीच्या दिवशी वर्ज्य आहे.

३) तांदळात जलाचे प्रमाण अधिक आहे आणि एकादशीला जास्त किंवा अती प्रमाणात पाणी पिणे अयोग्य मानण्यात येते म्हणून तांदूळ सेवन करु नये असे मानतात....

वरील तिन्ही मुद्दे मी एकादशीला तांदुळ भगर वर्ज्य का? यासाठी संदर्भ म्हणून दिले आहेत. धार्मिक संदर्भाचा उपवास करताना अधिकाधिक नियम पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. एकादशीच्या दिवशी साबुदाणा, बटाटा, अनेक कंदमुळे, सुरण, रताळी, शिंगडा, केळी आणि इतर सर्व प्रकारची फळे, दूध, फळांचे रस, सुका मेवा, राजगिरा असे असंख्य अगणित खाद्यपर्याय उपलब्ध असल्याने भगर खाण्याचा हट्ट सहज सोडता येईल.  भगर पौष्टिक, पोटभरीची आणि अनेक चांगल्या आरोग्यसंपन्न गुणधर्मानी युक्त आहे पण अमुक एका संदर्भानुसार जर ती एकादशीला वर्ज्य आहे तर एकादशी वगळता अन्य दिवशी तिचे सेवन करायला काहीच हरकत नाही. 

टॅग्स :foodअन्न