शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Jyestha Amavasya 2023: ज्येष्ठ अमावस्येला वृषभव्रत केल्याने शिवलोकीची प्राप्ती होते म्हणतात; सविस्तर जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:53 IST

Jyestha Amavasya 2023: १८ जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे, त्या दिवशी बैल पोळ्यासारखाच कृषी क्षेत्राशी संबंधित सोहळा केला जातो, वृषभ व्रताचा; त्याबद्दल अधिक वाचा. 

जिवाशिवाची बैल जोड आपल्याला आठवते ती बैलपोळ्याला. परंतु ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी 'वृषभव्रत' नावाने आणखी एक सोहळा पार पाडला जातो, तो म्हणजे बैलपूजेचा. विधी सारखाच असला, तरी उद्दीष्ट वेगळे आहे. ते कोणते, हे जाणून घेऊ.

या तिथीला बैलांची पूजा केली जाते. त्याला बेंदूर म्हणतात. त्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला लाकडाच्या बैलांची घरातच पूजा केली जाते. धर्माचे प्रतीक म्हणून ही पूजा केली जाते. धर्माला वृष संबोधले गेले आहे. ही पूजा शिवलोकप्राप्तीसाठी केली जाते. 

हे व्रत आणखी एका प्रकारे केले जाते. त्यामध्ये आपल्या सोयीने कुठल्याही महिन्यात शुक्ल सप्तमीला उपवास करून अष्टमीला एका बैलाला दोन शुभ्रवस्त्रांनी वा झुलींनी तसेच गोंडे, मण्यांच्या माळा, फुलमाळा यांनी सजवून त्याची पूजा करून तो दान दिला जातो. भगवान शिवशंकरांना नंदी प्रिय आहे. त्यांचे वाहन बैल आहे. त्यामुळे या पूजेने त्यांना प्रसन्न केले जाते. आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे बैलांना अतिशय महत्त्व आहे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण बैलपोळ्याला त्यांची पूजा करून व्यक्त करतोच. परंतु येथे 'धर्म' मानून बैलांची पूजा करण्याच्या विधीमुळे ही पूजा वेगळी ठरली आहे. 

आताच्या काळात शहरात बैल दिसणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा पुजाविधी करणे अवघड ठरते. यावर पर्याय म्हणून लाकडाच्या बैलांची पूजा सांगितली आहे. ही पूजा सामुहिकरित्यादेखील करता येते. त्यानिमित्ताने बैलांचे पालन पोषण करणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला दान किंवा आर्थिक मदतही करता येते. कालांतराने विधी-परंपरांचे स्वरूप बदलत असले, तरी धर्म टिकवण्याच्या आणि रुजवण्याच्या दृष्टीकोनातून या तिथींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

येत्या रविवारी म्हणजे १८ जून रोजी ज्येष्ठ अमावस्येला हे व्रत आहे. यथाशक्ती हे व्रत करून आपणही शिवलोकाची प्राप्ती करू शकतो.