शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 08:35 IST

Jyeshta Ravi Pradosh June 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: ज्येष्ठ महिन्यातील प्रदोष व्रतावेळी महादेवांची कृपा लाभावी, सूर्याची सकारात्मक अनुकूलता मिळावी, यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या...

Jyeshta Ravi Pradosh June 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: ज्येष्ठ महिना सुरू असून, अनेकार्थाने हा महिना विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. निर्जला एकादशीचे व्रत झाल्यानंतर प्रदोष व्रताचे आचरण आहे. प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. रवि प्रदोष व्रतामध्ये महादेव शिवशंकर यांच्या पूजनासह नवग्रहांचा राजा मानला गेलेल्या सूर्याशी संबंधित काही उपाय केल्यास अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. रवि प्रदोष व्रत केव्हा आहे? व्रताचरण कसे करावे? सूर्याशी संबंधित प्रभावी मंत्र आणि काही उपाय जाणून घेऊया...

ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील प्रदोष रविवारी येत आहे. त्यामुळे याला रवि प्रदोष असे म्हटले जाते. या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य पूजन करणे, सूर्य मंत्रांचे, स्तोत्रांचे पठण करणे उपयुक्त आणि पुण्य फलदायी ठरू शकते. असे केल्याने कुंडलीतील सूर्य सकारात्मक होऊ शकतो. सूर्याचा प्रतिकूल, नकारात्मक प्रभाव कमी होऊन अनुकूल परिणाम वाढू शकतो, असे सांगितले जाते. रविवार, ०८ जून २०२५ रोजी प्रदोष आहे. या प्रदोषावेळी लक्ष्मी राजयोग तसेच बुधचा भद्र महापुरुष राजयोग जुळून येत आहे. 

रवि प्रदोष व्रत कसे करावे? पाहा, सोपा पूजा विधी

प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. मनोभावे महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. यासह 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे. यासह ॐ 'नमो भगवते रुद्राय नमः', 'ॐ पषुप्ताय नमः', या मंत्रांचे पठण लाभदायक मानले गेले आहे, असे सांगितले जाते. 

रवि प्रदोष व्रताचे महात्म्य, महत्त्व आणि मान्यता

प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. शत्रूंपासून बचाव होऊ शकतो. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. काही पौराणिक उल्लेखानुसार, भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

रवि प्रदोष व्रतात महादेवांची कृपा लाभण्यासाठी काय करावे?

मनोकामना पूर्ण करण्यासाठी 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी भोलेनाथांना 'ॐ नमः शिवाय' म्हणत बिल्वपत्र अर्पण करा. या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल. रवि प्रदोष व्रताच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. अज्ञात भीती वाटत असेल, शरीर शक्तीहीन वाटत असेल, आत्मविश्वासाची कमतरता असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिव पंचाक्षरी मंत्र 'ॐ नमः शिवाय' १०८ वेळा जप करावा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळा वापरा. लाभ होईल. घरातील, कुटुंबातील शांततेसाठी, सुख-समृद्धीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करा. नंतर त्यापासून भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला खाऊ घाला. तुमची इच्छा पूर्ण होईल, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

रवि प्रदोष व्रतावेळी सूर्याशी संबंधित काही प्रभावी मंत्र आणि उपाय

प्राचीन काळापासून रविपूजन केले जात आहे. रामायणात प्रभू श्रीरामांनीही सूर्योपासना केल्याचे सांगितले जाते. पंचदेव उपासनेत गणेशपूजा, शिवपूजा, विष्णूपूजा, देवी भगवती दुर्गापूजा यांप्रमाणे रविपूजेला महत्त्व दिले जाते. जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम । तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम ।। हा नवग्रह स्तोत्रातील रविचा मंत्र आहे. या मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. ॐ आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयत।।, हा रविचा गायत्री मंत्र आहे. तसेच अर्घ्य अर्पण करण्यासह आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल, तर या स्तोत्राचे श्रवण करावे, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक