शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हरीणीच्या बाबतीत एका क्षणात जसा चमत्कार घडला, तसा तुमच्याही बाबतीत घडू शकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 08:00 IST

आपल्यावरही चोहोबाजूंनी संकट ओढावल्याची स्थिती जाणवेल, त्यावेळेस मनापासून परमेश्वराचा धावा करा. एक संधी मागा. ती निश्चित मिळेल.

उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलात घनदाट वनराई असूनही सूर्याचा प्रकोप सर्व प्राणीमात्रांना असह्य झाला होता. अशातच वणवा पेटला आणि आग पसरू लागली. जीव वाचवण्याच्या भीतीने प्राणी सैरावैरा पळू लागले. त्यातच एक हरीणी होती. ती गर्भार होती. आगीचे लोळ चहू बाजूंनी उठत होते. तिचा प्रसुतीकाळ समीप आला होता. पिलांना जन्म देण्यासाठी ती सुरक्षित जागा शोधत होती. ती नदीजवळ येऊन पोहोचली. तिथला परिसर आगीपासून मुक्त होता. 

परंतु आपला कोणीतरी पाठलाग करत आहे, याची तिला जाणीव झाली. तिने नजरेच्या कडेने पाहिले, तर एक शिकारी झाडाझुडूपात दबा धरून बसला होता. नदी पार करून जाण्याचे हरीणीत त्राण नव्हते. नदीच्या पलीकडे वाघोबा शिकार मिळेल म्हणून आशेने पाहत होता.

हरीणीला वाटले, आपला शेवट जवळ आला आहे. मी माझ्या पिलांना जन्म देऊ शकले नाही. ही सृष्टी दाखवू शकले नाही. माझ्याबरोबर त्यांचाही अंत होणार. चोहोबाजूंनी संकट ओढावल्यामुळे ती डोळे मिटून परमेश्वराचा धावा करू लागली. `देवा, माझ्या पिलांना जन्म घेण्याची संधी दे. त्यांना ही सृष्टी पाहू दे. आमचे रक्षण कर.' 

शिकाऱ्याने बंदूकीवर नेम धरला आणि हरीणीच्या दिशेने गोळी सोडणार, तोच त्याच्या डोळ्यात वणव्याची ठिणगी वाऱ्यासरशी येऊन त्याच्या डोळयात उडाली. त्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला. हरीणीवर धरलेला नेम वाघोबाच्या दिशेने वळला आणि त्या गोळीने वाघोबा घायाळ झाला. शिकारी डोळ्याला झालेल्या जखमेमुळे पळत सुटला. वाघोबा निपचित पडला. क्षणार्धात वातावरणात बदल झाला. काळे ढग दाटून आले. हलक्या हलक्या सरी बरसू लागल्या. जंगलातली आग विझली. काही क्षणांपूर्वी चोहोबाजूंनी ओढावलेले संकट एकाएक नाहीसे झाले. हरीणीने देवाचे मनोमन आभार मानले आणि नदीकाठच्या त्या रम्य परिसरात, शीतल वातावरणात गोंडस पाडसांना जन्म दिला.

त्या संकटाच्या प्रसंगी हरीणी डगमगली नाही, तिची देवावरची श्रद्धा डळमळीत झाली नाही आणि संकटातून पळ काढला नाही, त्याचप्रमाणे आपल्यावरही चोहोबाजूंनी संकट ओढावल्याची स्थिती जाणवेल, त्यावेळेस मनापासून परमेश्वराचा धावा करा. एक संधी मागा. ती निश्चित मिळेल. यासाठी अढळ श्रद्धा हवी. तर आणि तरच एका क्षणात चमत्कार घडतो आणि चित्र पालटते.