शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

देवाकडे काहीही मागणे योग्य असते की अयोग्य? वाचा हा दृष्टांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 10:02 IST

देवाकडे काही मागायचेच असेल, तर देवाचे सान्निध्य मागावे. त्याची सेवा मागावी. आपोआप आपले मनोरथ पूर्ण होते. 

आपण सगळेच देवाकडे गेल्यावर काही ना काही मागत असतो. जेवढे काही मिळालेले आहे, त्याबद्दल समाधान न मानता काय मिळाले नाही, याबद्दल देवाकडे तक्रार करतो. एका कवितेत एक कवी म्हणतात, 

आम्ही देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखे वागतो,चार आठाणे टाकून काहीतरी मागतो!

आता चार आठाण्यांचा जमाना राहिला नाही. म्हणून आताचे भक्त देवाला सोने, चांदी, हिरे, गाडी, बंगला ऑफर करतात. पण अशा प्रलोभनांना भूलेल तो देव कसला? देव तर भावाचा भुकेला. त्याला हवा असतो तो केवळ शुद्ध भाव! त्याचा मात्र असतो अभाव! आपण देवाकडे मागत राहतो आणि देव देत राहतो. कारण असे मागणारे देवाला जवळ नकोच आहेत. जे आपल्याकडचे दुसऱ्याला देऊ करतात आणि देवाला आपलेसे करतात, असेच भक्त देवाला हवे आहेत. म्हणून देवाकडे जाऊन काहीही मागणे म्हणजे देवाला आपल्यापासून दूर करण्यासारखे आहे. 

देवाकडे काहीही का मागू नये. याबाबत समर्थ रामदास स्वामींचा एक दृष्टांत सांगितला जातो. समर्थांचा शिष्य समर्थांना विचारतो, 'गुरुदेव, देवाकडे आपण काहीही मागणे योग्य असते का? आणि योग्य असले तर काय मागितले पाहिजे?'

समर्थ आपल्या शिष्याला घेऊन एका राजाच्या महालाबाहेर गेले. दूर एका झाडाखाली ते दोघे उभे होते. तिथून राज दरबारातील परिसराचे अवलोकन करत होते. त्या परिसरात एक भिकारी बसला होता. जाता येता राजाची दृष्टी आपल्यावर पडावी या हेतूने तो तिथे बसला होता. समर्थांनी त्याच्याकडे बोट दाखवत शिष्याला सांगितले, भिकारी राजाकडे काही न मागता केवळ त्याच्या दृष्टीक्षेपात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला काय गरज आहे, हे राजाने ओळखावे आणि त्याला मदत करावी, अशी भिकाऱ्याची अपेक्षा आहे. त्यानुसार राजाची त्याच्यावर नजर जाताच, सेवकांकरवी राजाने त्याला अन्न धान्य, कपडे दान दिले. भिकाऱ्याची गरज भागली. 

आपण मंदिरात जाऊन देवाकडे काही मागत असू तर आपल्यात आणि त्या भिकाऱ्यात काहीच भेद उरणार नाही. प्रश्न राहिला देवाच्या दृष्टीक्षेपात येण्याचा, तर तो आपल्या सर्वांकडे लक्ष ठेवून आहे. म्हणून त्याच्याकडे निदान ऐहिक सुखं मागण्याची आवश्यकता नाही. काही मागायचेच असेल, तर देवाचे सान्निध्य मागावे. त्याची सेवा मागावी. आपोआप आपले मनोरथ पूर्ण होते.