शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सकाळी सकाळी 'या' गोष्टींचे नजरेस पडणे ठरते लाभदायक; जाणून घ्या त्या लकी ठरणाऱ्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 11:04 IST

ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी सकाळीच नजरेस पडल्याने दिवसभरात अचानक अनेक लाभ होतात. या लाभाचे कारण पुढील गोष्टींमध्ये दडलेले असू शकते!

आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो. म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपल्या तळ हाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे. कारण आपल्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो. त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो. त्यानंतरही काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्यांचे दर्शन आपल्या दिवसाला आनंद दायी, लाभदायी होण्यास कारणीभूत ठरते. 

सकाळी पुढील गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या तर त्या लाभदायी ठरणार असे समजा: 

>>सकाळी जाग येताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जा की दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र लक्षात घ्या, पक्ष्याचा किलबिलाट पहाटेच जास्त ऐकू येतो. त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाग येणे क्रमप्राप्त झाले. ज्याचा दिवस ब्रह्म मुहूर्तावर सुरु होतो त्याचा दिवस चांगला जाणारच असे शास्त्र सांगते!

>>सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देव दर्शनाला सोवळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसला, तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला मोठे काम मिळण्याचीही शक्यता असते. 

>>सकाळी उठल्यावर आपल्याला पांढऱ्या फुलांचे दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणारच!

>>ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाचे भरलेले पातेले दिसणे हेदेखील शुभ व सुबत्तेचे लक्षण मानले गेले आहे. तसेच तुमच्या घरात दूध, दह्याची साठवण केल्यामुळे लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहील. 

>>सकाळी किंवा कामासाठी घराबाहेर पडताना गो मातेचे दर्शन होणे देखील शुभ ठरते. गोमातेच्या केवळ दर्शनानेदेखील आपल्या नोकरी, व्यायवसायत भरभराट होते. 

>>सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे देखील शुभ मानले जाते. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार, याचे ते चिन्ह असते. 

>>एखाद्या झाडाला फळे लगडलेली पाहिलीत, तर तुमच्या प्रयत्नांनादेखील लवकरच चांगले फळ मिळणार आहे असे समजून जा. 

>>सकाळी डोळे उघडताच जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देव्हाऱ्यातील घंटेचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता जाते. तसेच कोणतेही बिघडलेले किंवा रखडलेले काम पूर्ण होऊ शकते.