शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांना करा 'जलदान'; अबोल जिवांची तहान भागवून मिळेल पुण्य, समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 07:05 IST

वाढत्या उन्हाळ्यात तहानलेल्या पशू-पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवणे हे केवळ पुण्याचे काम नसून मानवी कर्तव्य आहे, सोबत पाळा 'हे' नियम!

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सूर्याचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्यामुळे केवळ माणसांनाच नाही, तर अबोल पशू-पक्ष्यांनाही पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या जिवांना उन्हाच्या झळांपासून वाचवण्यासाठी 'जलदान' करणे, हे या काळातील सर्वात मोठे पुण्याचे कार्य मानले जाते.

हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर

रणरणत्या उन्हात घसा कोरडा पडल्यावर पाण्याचा एक घोट मिळणे हे अमृतासारखे असते. आपण माणसे मागून पाणी पिऊ शकतो, पण पाळीव प्राणी आणि पक्षी मात्र पाण्याच्या शोधात तासनतास फिरत राहतात. अनेकदा पाण्याचे स्रोत आटल्यामुळे हे जीव मृत्यूच्या दारात पोहोचतात. अशा वेळी आपल्या घराची बाल्कनी, गच्ची किंवा अंगणात थोडेसे पाणी ठेवणे त्यांच्यासाठी जीवनदान ठरू शकते.

१. जलदानासाठी काही साध्या पण प्रभावी टिप्स

मातीची भांडी वापरा: पाणी ठेवण्यासाठी प्लास्टिकऐवजी मातीच्या पसरट भांड्यांचा (मातीची कुंडी किंवा परळ) वापर करा. मातीच्या भांड्यात पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते, जे पक्ष्यांसाठी जास्त सुखद असते.

पाणी सावलीत ठेवा: भांडे थेट उन्हात न ठेवता झाडाच्या सावलीत किंवा घराच्या छताखाली ठेवा, जेणेकरून पाणी जास्त वेळ थंड राहील.

नियमित स्वच्छता: पाण्याचे भांडे दररोज स्वच्छ धुवा आणि त्यात ताजे पाणी भरा. साठलेल्या पाण्यात डास होण्याची किंवा बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते, जी पक्ष्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

सुरक्षित जागा: पक्ष्यांसाठी पाणी उंचावर ठेवा, जिथे मांजरी किंवा इतर प्राण्यांपासून त्यांना धोका नसेल. प्राण्यांसाठी मात्र जमिनीवर सुरक्षित ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा.

२. अन्नाचीही सोय करा

पाण्यासोबतच मातीच्या भांड्यात थोडे धान्य (बाजरी, ज्वारी किंवा तांदूळ) ठेवल्यास पक्ष्यांना अन्नासाठी वणवण करावी लागणार नाही.

हे ही वाचा : Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत

३. जलदानाचे महत्त्व: सामाजिक आणि आध्यात्मिक

धार्मिक दृष्टिकोनातून तहानलेल्याला पाणी पाजणे हे 'महादान' मानले जाते. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर, चिमण्या आणि इतर दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपली ही छोटीशी मदत मोलाची ठरते. जेव्हा एखादा पक्षी तुमच्या घरी पाणी पितो, तेव्हा त्यातून मिळणारे आत्मिक समाधान कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Offer water to animals, birds in summer; Gain virtue, satisfaction!

Web Summary : As summer intensifies, provide water for thirsty animals and birds. Use earthen pots, keep water in shade, clean regularly. Offering water is considered a noble deed, aiding wildlife preservation and providing immense satisfaction.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल