शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सुखी आयुष्य जगायचे असेल, तर 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 08:00 IST

मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!

जीवनाचे हित साधण्यासाठी, सकाळपासून रात्रीपर्यंतीची सर्व कर्मे शास्त्रशुद्ध असावयास हवीत. उदा. पहाटे उठून वेळेनुसार ठराविक आसने नियमित करणे, त्यात कमीत कमी दहा मिनिटे नामस्मरण विंâवा ध्यान करणे. शक्यतो नामस्मरण एकांतात करणे. नंतर दिनचर्या निष्कामतेने सुरू करावी. लहानपणापासून बिंबवलेल्या बोधवचनांना मोठेपणीही जीवनात उच्च स्थान द्यावे.ही बोधवचने कोणती? तर...

सत्यम वद - खरे बोलाधर्म चर - धर्माने वागामातृदेवो भव- आईला देव मानापितृदेवो भव- वडिलांना देव मानाआचार्य देवो भव - गुरुंना देव मानाअतिथी देवो भव - अतिथीला देव मानास्वाध्यायान्मा प्रमद: - नियमितपणे पठण करण्यास चुकू नका.श्रद्धया देयम - श्रद्धेने दान करा

वरील वचने कृतीत उतरवली तर कोणताही माणूस वैयक्तिक, कौटुंबिक, अखिल विश्वामधील प्रत्येक जीवाबद्दल आस्था, समतोल नक्कीच सांभाळू शकेल. शिवाय या वचनांमधून क्रियाशिलता जाणवते. अगदी सूक्ष्म स्तरावरसुद्धा!

तसेच रात्री झोपण्यापूर्वी कृतकृत्येच्या विश्वासात `परमेश्वराने निर्माण केलेल्या या विश्वरचनेमधील अखिल प्राणीमात्रांचे कल्याण होवो' या प्रकारच्या भगवद्स्मरणाने स्वत:मधील चैतन्याला नम्रभावनेने वंदन करून शांत झोपी जावे.

शांत, समाधानी आयुष्य हवे असेल तर या गोष्टींचे पालन रोज करायलाच हवे. अपेक्षांची यादी न संपणारी आहे. त्या पूर्ण करण्याच्या नादात आयुष्याचे सोनेरी क्षण वाया घालवणे महागात पडू शकते. आयुष्यभर केलेल्या चुकांची जाणीव आयुष्याच्या उत्तरार्धात होते, परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!