शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रकारच्या दुःखाचा शेवट करायचा असेल तर मंत्र एकच- सोडून द्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 11, 2021 19:15 IST

मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये.

कोणी आपल्यासमोर त्याचे दुःख उगाळू लागले, की सांत्वनपर आपण एकच वाक्य म्हणतो, 'जाऊ द्या, सोडून द्या...!' पण वेळ जेव्हा आपल्यावर येते, तेव्हा हे शब्द कानावर पडताच आपण राग राग करतो. परंतु, शांत डोक्याने विचार केला, तर काही गोष्टी सोडून देण्यातच खरे शहाणपण असते. स्वामी विवेकानंद म्हणत, 'मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये.' त्याप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाहीत, त्या सोडून द्याव्यात आणि नवीन गोष्टींचा ध्यास घेऊन आयुष्य सुरु ठेवावे. समाज माध्यमावर वाचण्यात आलेल्या एका कवितेत खूप छान वर्णन केले आहे,

एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेलतर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं

ऐकूनही न ऐकल्या सारखं करत असतील तर उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं

मुलं मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं

एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवलीतर मनावर घेणं सोडून द्यावं

आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं

ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणंसोडून द्यावं

प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळंम्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं

आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  सोडून द्यावं