शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

खऱ्या अर्थाने 'योगी' बनायचे असेल, तर आधी 'उपयोगी' बना! - गौर गोपालदास प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 12:38 IST

दुसऱ्यांना देण्यात, मदत करण्यात, उपयोगी पडण्यात जे समाधान आहे, ते स्वत:पुरते जगण्यात कधीही अनुभवता येणार नाही.

आईस्क्रीमला संस्कृतात एक छान शब्द आहे, 'दुग्धशर्करायुक्तहिमघनगोलगट्टू' आईस्क्रीमसारखाच हा शब्दही गोड आहे, नाही का? पुढच्या वेळेस आईस्क्रीम खाणार का ऐवजी हा शब्दप्रयोग आवर्जून करा. तुम्हाला आणि ऐकण्याऱ्याला मजा येईल. आहे ना मजेशीर? आईस्क्रीम आपल्या सर्वांना आवडते. परंतु, ते खाताना आपली जी मानसिकता असते, ती आपली भोगी आणि विलासी वृत्ती दर्शवते. आईस्क्रीम वितळण्याआधी खाऊन टाका, त्याचा आनंद घ्या. वास्तविक पाहता, यात चुकीचे असे काहीच नाही. परंतु यात केवळ मी आणि माझा एवढाच विचार दिसून येता़े  असा विचार करणाऱ्यांना केवळ तात्पुरते समाधान मिळू शकते. परंतु ज्यांना चिरंतन आनंद, समाधान हवे आहे, त्यांनी मेणबत्तीचा आदर्श बाळगायला हवा.

आईस्क्रीम आणि मेणबत्ती यात एक साम्य आहे. ते म्हणजे दोन्ही वितळतात. परंतु, आईस्क्रीमचा आनंद एकाला मिळतो, तर मेणबत्ती वितळताना, जळताना दुसऱ्यांना प्रकाशमान करून जाते. आनंद आईस्क्रीमचा घेतला, तरी आदर्श कायम मेणबत्तीचा ठेवायला हवा.

दुसऱ्यांना देण्यात, मदत करण्यात, उपयोगी पडण्यात जे समाधान आहे, ते स्वत:पुरते जगण्यात कधीही अनुभवता येणार नाही. आपण केलेल्या छोट्याशा मदतीमुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद तुम्ही जगातली महागडी वस्तू विकत घेऊनसुद्धा मिळेल, याची शाश्वती नाही. कारण, भौतिक सुख हे क्षणभंगूर असते. जसे की महागडी गाडी विकत घेतली, परंतु त्यावर साधा ओरखडा पडला, अपघात झाला, बिघाड झाला, की आनंदावर विरजण पडते. याउलट दुसऱ्याला केलेली छोटीशी मदत त्याने लक्षात ठेवो न ठेवो, तुम्हाला सत्कर्म केल्याचा आनंद आयुष्यभर देते. 

म्हणून आईस्क्रीम आणि मेणबत्ती या दोन्ही गोष्टी वितळणाऱ्या असल्या, तरी एकाचे वितळणे स्वार्थासाठी तर दुसऱ्याचे वितळणे परमार्थासाठी आहे, हे लक्षात घ्या.आयुष्यात योगी बनायचे असेल, तर आधी उपयोगी बनायला शिका, कारण त्यातच अत्युच्च समाधान दडले आहे. 

-इति गौर गोपालदास प्रभू (जगविख्यात धार्मिक व्याख्याते)