शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आयुष्याचा कंटाळा आला असेल तर 'कालमापन यंत्र' आजच विकत घेऊन या; कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:51 IST

गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय ...

गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय पाहिला, तो तसाच उद्या अनुभवता येईल असे नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. परंतु, या संधीचे सोने केले नाही, तर वेळ वाया गेला, असे म्हणावे लागेल. यासाठी वेळेच्या नियोजनाला प्राधान्य द्या; सांगत आहेत आध्यात्मिक वक्ते ग्यानवत्सल स्वामी. 

स्वामींनी वेळ व्यवस्थापनाला त्रिसूत्रीत विभागले आहे. ते सांगतात, वाळूचे कालमापनाचे यंत्र डोळ्यासमोर ठेवा. झरझर निसटणारी वाळू म्हणजे आपल्या हातून निसटणारी वेळ आहे. तिचा योग्य विनिमय करायचा असेल तर प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवायला शिका. हा हिशोब कसा मांडायचा? तर दिवसातल्या २४ तासांना तीन टप्प्यात विभागून घ्या. 

पहिले आठ तास झोपेचे. ती पूर्ण झाली नाही, तर सगळे गणितच बिघडेल. पुढचे आठ तास आपल्या नियोजित कामाचे. अभ्यास, व्यवसाय, नोकरीचे. शेवटचे आठ तास, जे आपण वाया घालवतो, ते आठ तास आपल्याला कामी लावायचे असतील, तर त्यात आणखी ९ भाग पाडून त्यांना आलटून पालटून प्राधान्य दिले पाहिजे. कसे ते बघा -

पहिला टप्पा :कुटुंब, मित्रपरिवार, नातेसंबंध दुसरा टप्पा : आरोग्य, स्वच्छता, छंदतिसरा टप्पा : आत्मसंवाद, निर्मळ हास्य आणि समाजसेवा

या गोष्टी शेवटच्या आठ तासात आपण केल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आयुष्यात कंटाळा येणारच नाही. नैराश्य स्पर्श करू शकणार नाही. वेळ वाया जाणार नाही आणि एक चांगले, आनंदी आणि निरोगी आयुष्य जगल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल. 

म्हणून आजपासून आयुष्यात ही त्रिसुत्री वापरायला सुरुवात करा, सकारात्मक बदल आपोआप घडू लागतील.