शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

विश्व म्हणजे प्रभूची प्रभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:19 IST

याचा अर्थ, विश्वासकट जे जे आहे ते मीच आहे. सदगुरू श्री वामनराव पेेै म्हणतात की, विश्व म्हणजे प्रभूची प्रभा आहे. 

माणूस हा निसर्गाचाच अविभाज्य भाग असून तो निसर्गाशिवाय जगूच शकत नाही या गोष्टीची जाणीवच आज "कोव्हीड १९" या विषाणूने पुन्हा एकदा जगाला करून दिली. वास्तविक "विश्व ही प्रभूची प्रभा" आहे. निर्गुण निराकार परमेश्वरच विश्व रूपाने सगुण साकार आहे. "पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश" ही महातत्वे त्याचेच अविष्कार आहेत. प्रत्येक प्राणीमात्र, जीवजंतू, पशूपक्षी, वृक्षवेली, नदी-नाले, डोंगरदर्‍या, पर्वतरांगांबरोबरच ग्रहगोल आणि तारे ही सर्वच त्याचीच रूपे आहेत. म्हणून सगळी कडे पाहिले तर अदभूत, अलौकिक, अगम्य अशी सुंदर व्यवस्था दृष्टीस पडते.

कोट्यावधी सुर्यमालिकांच्या हजारो आकाशगंगा या अवकाशात आहेत, हे शास्त्रज्ञ जेंव्हा सांगतात, तेंव्हा मती गुंग होते. स्वत:भोवती फिरत फिरत ग्रहांचे सुर्याभोवती फिरणे. ग्रहांच्या भोवती उपग्रहाचे फिरणे हे सर्व विस्मयकारक आहे. सुर्याच्या उष्णतेने समुद्राच्या खार्‍या पाण्याची वाफ होऊन निर्माण झालेले ढग पावसाच्या रूपाने गोड पाण्याचा वर्षावच पृथ्वीवर करतात. हवा अॉक्सिजन रूपी प्राणवायू जगाला देते. वृक्ष कार्बनडायऑक्साईड घेतात व अॉक्सिजन जगाला देतात. "एका बीजापोटी तरूवर कोटी," ही व्यवस्था जगात सगळी कडे दिसते. या वृक्षांना धरून ठेवणार्‍या डोंगर व पर्वतांमुळेच पशु पक्ष्यांना आसरा मिळतो. रंगीबेरंगी फुलांचा सुगंध, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे पाहून मन मोहून जाते. प्रत्येक प्राणी काहीना काही देत असतो म्हणूनच हे विश्वाचे रहाटगाडगे युगानुयुगे सुखनैव चालू आहे. आपले जगणे आनंदमय करणारे हे जग ही एक सुंदर पध्दतशीर व्यवस्था आहे.

विश्व परते सारावे। मग माते घ्यावे॥ऐसे मी नोव्हे। आवघे सकटची मी॥

याचा अर्थ, विश्वासकट जे जे आहे ते मीच आहे. सदगुरू श्री वामनराव पेेै म्हणतात की, विश्व म्हणजे प्रभूची प्रभा आहे. 

स्वत:च्याच ठायी असणारा आनंद चाखण्यासाठी निर्गुण निराकार परमेश्वर विश्व रूपाने सगुण साकार झाला. आनंद उपभोगण्याची उपाधी म्हणजेच माणूस प्राणी. 

मानवी देहाची या ज्ञाने।सच्चिदानंद पदवी घेणे॥*

परमेश्वर एक पायरी खाली आला तो झाला माणूस. प्रत्येक प्राणी,पक्षी, वनस्पती यांकडे काहीतरी वेगळेपण आहे तसे मानव प्राण्याचे वैशिष्ट म्हणजे त्याला मिळालेले बुध्दीचे वरदान व ती वापरण्याचे कर्म स्वातंत्र्य. मानवाने याच बुध्दीचा वापर करून जगाचे नंदनवन करावे, त्याला अधिक सुंदर बनवावे व स्वत:च्या ठायी असलेल्या स्वानंद, कर्मांच्या द्वारे जगाला वाटावा. म्हणूनच सदगुरू श्री वामनराव पै सांगतात की, आनंद वाटता वाटता लुटण्यासाठीच माणूस जन्माला आला आहे.

पण प्रत्यक्षात मात्र माणसाने बुध्दीचा दुरूपयोग करून निसर्गावरच मात करण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा व पर्यावरणाचा प्रचंड र्‍हासच माणसाने केला. परीणामी विकास हा भकास ठरू लागला आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा गैरवापर, सर्व स्तरांवर होणारे प्रचंड प्रदुषण यामुळे निर्माण झालेले ग्लोबल वार्मिंग माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे. हे जग स्वत:च्या मालकीचे आहे असे माणूस वागू लागला. स्वत:च्या स्वातंत्र्याचा विचार करणार्‍या माणसाने सर्व प्राणिमात्रांना मात्र पारतंत्र्यात टाकले. अनेक प्राण्यांच्या व वनस्पतींच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आल्या आहेत यालाही कारण केवळ मानवाचा उन्मत्तपणा ठरत आहे. पर्यावरणाचा र्‍हास झाला तर माणूस वरणभात खायला सुध्दा शिल्लक राहणार नाही. एक वनस्पतीची किंवा पशूपक्ष्यांची एक जात जरी नष्ट झाली तरी सर्व मानवजात नष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून पर्यावरण जपणे हे मानवजातीचे कर्तव्य आहे. पर्यावरण हाच आहे नारायण व त्याची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे Man is a social animal. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. कुटूंब, समाज, राष्ट्र व विश्व आहे म्हणून आपण आहोत. आजी आजोबा, आईवडिल, मुले, भावंडे, आत्या मावशी, काका-काकी, मामा-मामी नवरा-बायको, सासू-सासरे, सून जावई इ. अनेक नात्यांमुळेच आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन आनंदमय होते. खरंतर आपण जन्माला एकटे येतो व मरतानाही एकटे जातो.  पण जीवन जगणे सुसह्य व्हावे म्हणून देवानेच ही नाती दिली. एकमेकांना समजून घेणे, तडजोड करणे, प्रेम देणे, त्यांच्या सुखासाठी झटणे हे आपले कर्तव्यच आहे. 

समाज आपल्याला जगण्यासाठी सर्वकाही देत असतो. असंख्य लोकं रात्रंदिन राबतात म्हणून समाजाचे अनंत ऋण आपल्यावर असतात. आपण सुध्दा आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करणे, हा समाज व राष्ट्राच्या ऋणातून उतराई होण्याचा राजमार्ग आहे. 

आज विश्व म्हणजे ग्लोबल व्हिलेज झाले आहे. परीणामी जगात इतर देशांत जे घडते त्याचा परीणाम आपल्यावर सुध्दा होतच असतो. याचेच उदाहरण म्हणजे कोरोना हा विषाणू होय. काही समजायच्या आता त्याने जगाला वेढले. अर्थिक महासत्ता असणारे देशही या महामारी पुढे हतबल झाले आहेत आणि माणसाला त्याच्या मर्यादांची जाणीवही झाली. थोडक्यात "स्वत: बरोबरच कुटूंब, समाज, राष्ट्र व विश्वातील प्रत्येक घटकाला जपणे," हाच परमेश्वराचा जप आहे.

म्हणून जग सुखी तर आपण सुखी. इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे व इतरांच्या दु:खात आपले दु:ख दडलेले आहे. जगातील प्रत्येक प्राणी, पक्षी, वनस्पती आपल्याकडे जे काही आहे ते जगाला देत जगात आनंदाची उधळण करीत आहेत. म्हणून माणसाने सुध्दा त्याकडे असणार्‍या बुध्दीच्या अधिष्ठानावर सत्कर्मांच्या द्वारे आनंदाची उधळण करणे, हे त्याचे कर्तव्य आहे. 

विचार, उच्चार व आचार यांद्वारे माणूस कर्म करीत असतो. विचारच चिंतन व इच्छा स्वरूपात माणसाच्या मनांत सतत घोळत असतात, ते अंतर्मनात जातात व अंतर्मनात नांदणार्‍या अनंत स्वरूप ईश्वरीशक्तीमुळे जीवनात आकाराला येतात. 

म्हणून जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार.

चिंता काळजीचे नकारात्मक विचार करण्यापेक्षा सतत सकारात्मक विचार स्वत:बद्दल व इतरांबद्दल करणे, हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे.सतत भरभराटीचे, सुखाचे,आरोग्याचे चिंतन केले तर आजची परीस्थिती बदलल्या शिवाय रहाणार नाही. 

शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे।शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने॥

निसर्गनियमांशी सुसंगत कर्म म्हणजेच सत्कर्म होय. ज्या कर्मांनी आपले व इतरांचे भले होते ते सत्कर्म. म्हणूनच सदगुरू श्री वामनराव पै यांनी अलौकीक व क्रांतिकारक अशी दिव्य विश्वप्रार्थना जगाला दिली. 

"हे ईश्वरा,सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."

या विश्वप्रार्थनेचे दिव्य विचार मनात सतत घोळवत ठेवणे, हाच सर्व समस्या, संकट, आजार यातून मुक्त होऊन निरोगी, समृद्ध, आनंदी व यशस्वी जीवनाचा राजमार्गच आहे.

- संतोष तोत्रेजीवन विद्या मिशन

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक