शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नात 'या' गोष्टी वारंवार दिसत असतील, तर हे आहे लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 13:31 IST

स्वप्न शास्त्रानुसार कधी कधी स्वप्नांमध्ये काही खास गोष्टी दिसतात व झोपेतून उठल्यावरही त्या गोष्टी पाहिल्याचे आपल्या स्मरणात राहते. त्या खास गोष्टी कोणत्या, जाणून घेऊ.

प्रत्येक व्यक्तीला आरामदायी जीवन आवडते. पण कष्टाशिवाय हे स्वप्न कोणाचेही साकार होत नाही. अगदी श्रीमंतांचेही नाही. कारण वरवर दिसणारी श्रीमंती टिकवूनही ठेवता आली पाहिजे. तिचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. म्हणून कष्टाला पर्याय नाही. भरपूर संपत्ती आणि विलासी जीवन प्रत्येकाला सहजासहजी मिळत नाही. तरीही माणूस त्याची स्वप्ने पाहतो.

श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाचे स्वप्नं असते. हे स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी मनुष्य धडपडत असतो आणि म्हणूनच त्याला झोपेत आणि जागेपणी धनवृद्धीची स्वप्ने दिसत असतात. या वैचारिक स्थितीमुळे झोपतेही विचारांचे चक्र सुरू राहते आणि विचार व प्रयत्न योग्य दिशेने सुरू असले, तर स्वप्नात शुभ संकेतही मिळतात. स्वप्न शास्त्रानुसार कधी कधी स्वप्नांमध्ये काही खास गोष्टी दिसतात व झोपेतून उठल्यावरही त्या गोष्टी पाहिल्याचे आपल्या स्मरणात राहते. त्या खास गोष्टी कोणत्या, ज्या आर्थिक समृद्धी दर्शवतात, त्या सहा गोष्टी जाणून घेऊ.

शंख ध्वनीशंखध्वनी ऐकणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला झोपेतही शंख ध्वनी ऐकल्याचा भास होत असेल तर ते शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती लवकरच सुधारणार आहे.

देवीचे देऊळअनेकांना स्वप्नात जुनी, प्राचीन व आजवर प्रत्यक्षात न पाहिलेली मंदिरे दिसतात. त्यात जर तुम्हाला देवीचे दर्शन घडत असेल तर हे अतिशय शुभ आहे. देवीच्या कृपेने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होऊन शुभ वार्ता ऐकायला मिळणार आहे.

फुलेझोपेतच काय, तर जागेपणीही फुलं पाहिल्यावर मन प्रसन्न होते. स्वप्नात तुम्हाला अशीच छान फुलांनी डवरलेली बाग दिसत असेल तर तुमची मनस्थिती उत्तम आहे, हे लक्षात घ्या. मन शांत असते तेव्हा अर्ध्याहून अधिक कामे वेळेत पार पडतात. याशिवाय स्वप्नात मोर, शहाळ किंवा फुलांचा हार दिसणे हे शुभ लक्षण आहे. ही स्वप्ने धनप्राप्तीचे संकेत देतात.

घुबडघुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. स्वप्नात घुबड दिसणे शुभ असते. जर स्वप्नात घुबड दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की येत्या काही काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

पांढरी गायस्वप्नात गाय दिसणे शुभ मानले जाते. त्यातही ती पांढरी शुभ्र गाय असेल, तर याचा अर्थ लवकरच काही विशेष लाभ होणार आहे. त्यासाठी स्वप्नातून जाग आल्यावर गोमातेची सेवा करायला तसेच तिला चारा पाणी द्यायला विसरू नका.

मंगल कलशकलश आपण पूजेत मांडतो. स्वस्तिक काढलेला, आम्रपल्लव घातलेला कलश पाहून मन प्रसन्न होतं. जर स्वप्नात असा मंगल कलश दिसत असेल तर लवकरच घरात मंगल कार्य घडणार असल्याचे संकेत आहेत. त्या निमित्ताने आप्त स्वकीयांच्या भेटी होतील व घरात आनंदाचे वातावरण राहील.