शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

लोकसंख्या नियंत्रणात न आणल्यास मानवी अस्तित्त्वाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 15:28 IST

तुम्ही कितीही झाडे लावलीत, तुम्ही कितीही धोरणे बदललीत, कोणत्याही प्रकारची तंत्रज्ञाने घेऊन आलात, तरीही जोपर्यंत आपण मानवी लोकसंख्येवर नियंत्रण आणत नाही, तोपर्यंत कोणताही उपाय करणे शक्य नाही.

भारत सरकारकडून इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणामधील एका निवडक उतार्‍यात, सद्गुरु आज लोकसंख्या हीच कशी मानवता सामना करत असलेली मूलभूत समस्या आहे यावर भाष्य करतात.

सद्गुरु: मी अशा अनेक परिसंवादात सहभागी झालो आहे जिथे लोकं आपण सामना करत असलेल्या अनेक समस्यांबद्दल बोलतात, उदाहरणार्थ, पाणी आणि पर्यावरण संवर्धन, पण मला मात्र या गोष्टीच्या वेदना होतात, की कोणत्याही सरकारला सर्वात मूलभूत समस्येकडे – म्हणजे लोकसंख्येकडे लक्ष द्यायचे नाही. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला, जगाची लोकसंख्या 1.6 अब्ज इतकी होती. आज एक शतकानंतर, आपण 7.2 अब्ज लोकं आहोत. असा अंदाज आहे, की 2050 पर्यन्त, लोकसंख्या 9.6 अब्ज येवढी होईल. मला असे वाटते की मानवाने केलेले हे एक अतिशय बेजबाबदार प्रजनन आहे. भारतामधे, 1947 साली, आपली लोकसंख्या 33 कोटी इतकी होती. आज आपण 130 कोटी लोकं आहोत. तुम्ही कितीही झाडे लावलीत, तुम्ही कितीही धोरणे बदललीत, कोणत्याही प्रकारची तंत्रज्ञाने घेऊन आलात, तरीही जोपर्यंत आपण मानवी लोकसंख्येवर नियंत्रण आणत नाही, तोपर्यंत कोणताही उपाय करणे शक्य नाही.

एकतर आपण आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायला हवे, किंवा निसर्गच ते काम अतिशय क्रूर पद्धतीने करेल. आपल्याकडे केवळ येवढाच पर्याय उपलब्ध आहे. विशेषतः भारतात, सध्या फक्त या 130 कोटी लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी 60% जमीन नांगरलेली आहे. आपले शेतकरी, अतिशय प्राथमिक, तोटक्या संसाधनांच्या सहाय्याने एक अब्जाहून अधिक लोकांसाठी धान्य पिकवतात. ही एक अतिशय कौतुकास्पद बाब आहे, आणि तरीसुद्धा जो मनुष्य धान्य पिकवतो, तोच आज अर्धपोटी आहे. हे काही कौतुकास्पद नाही; यात अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही. मूलतः याचे कारण असे आहे की आपण हे ठरवण्याची जबाबदारीच स्वीकारलेली नाही, की  “ठीक आहे, येवढी जमीन आहे – यात आपण किती लोकसंख्येचे पोषण करू शकतो?”  ती मानवी लोकसंख्येच्या अमर्याद वाढीला पुरेशी पडू शकतच नाही.

ही पृथ्वी केवळ मनुष्यप्राण्यासाठी निर्माण केलेली नाही

ही पृथ्वी केवळ मनुष्य प्राण्यासाठीच निर्माण केलेली आहे हे कल्पना की एक अतिशय बावळट कल्पना आहे. लोकांच्या मनात ती असे सांगून बिंबवली गेली आहे, की” तुम्ही परमेश्वराचीच एक प्रतिमा आहात.” माझी खात्री आहे की एखाद्या अळीला सुद्धा असेच वाटत असेल की परमेश्वर एका मोठ्या अळीसारखाच दिसतो! पर्यावरणीय कारणांसाठी नाही, तर फक्त आपल्या मानवतेच्या हितासाठी, तुम्ही हे समजावून घेणे आवश्यक आहे, की या पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याचे स्वतःचे असे एक संपूर्ण जीवन आहे. अगदी एखाद्या किडयाला सुद्धा त्याचे स्वतःचे असे एक संपूर्ण जीवन आहे – त्याच्या जीवनात अनेक गोष्टी घडत असतात. केवळ एखादा प्राणी लहान आहे, किंवा तुमच्यापेक्षा वेगळा दिसतो, म्हणून त्याला जगण्याचा अधिकारच नाही आणि फक्त तुम्हालाच इथे जगण्याचा अधिकार आहे असा विचार करणे म्हणजे मानवतेसाठी या पृथ्वीवर अस्तीत्वात राहण्याचा एक ढोबळ मार्ग  आहे.

माणुसकी नसलेली मानवता, हीच आजच्या मानवतेची वास्तविकता आहे. जोपर्यंत मानवतेचा विचार केला जात नाही, तोपर्यंत मानवी लोकसंख्या जाणीवपूर्वक नियंत्रण आणण्यासारख्यागोष्टी घडतील असे मला वाटत नाही. सरकारांना धोरणे निश्चितच बनवायला लागतील, पण लोकशाहीत त्यांना या प्रकारच्या गोष्टी लोकांवर लादता येणार नाहीत. केवळ प्रचाराद्वारे आणि योग्य ती जागरूकता निर्माण करूनच असे करता येऊ शकते, पण सरकारद्वारे मात्र ही कल्पना नक्कीच पुढे करायला हवी. खाजगी संस्था आणि एनजीओ काहीतरी करू शकतील, पण तरीही सरकारी कार्यवाही आवश्यक आहे.

मानवी लोकसंख्येवर नियंत्रण आणल्याखेरीज पर्यावरण, भू-संवर्धन किंवा जल-संवर्धनाविषयी बोलून काहीही फरक पडणार नाही कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवाला जी प्रेरणा मिळते आहे त्यामुळे मनुष्यप्राणी अतिशय जास्त सक्रीय बनत चालला आहे. तुम्ही लोकांच्या कार्यक्षमतेवर बंधने घालू शकत नाही कारण तसे करणे म्हणजे लोकांच्या इच्छा नियंत्रित करण्यासारखे आहे. तुम्ही फक्त लोकसंख्येवर नियंत्रण आणू शकता. 

जन्मदरावर ताबा मिळवणे

1947 मधे, भारतीयांचे सर्वसाधारण सरासरी आयुर्मान 32 वर्षे होते. आज ते 65 वर्षांच्या पुढे गेलेले आहे. तर आपण मृत्यूवर ताबा मिळवला, पण आपण जन्मावरसुद्धा ताबा मिळवायला हवा. आज तुमच्याकडे पुरेशा बसेस नाहीत, जमीन नाही, स्वच्छतागृहे नाहीत, मंदिरे किंवा 1.2 अब्ज लोकांना पुरेल येवढे आकाश सुद्धा नाही. आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो, आणि ती म्हणजे – आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या संसाधनानुसार आपण आपली लोकसंख्या नियंत्रित करणार आहोत का? प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जर ही जाणीव निर्माण करता आली आणि आवश्यक ते शिक्षण दिले गेले तर ही एक गोष्ट प्रत्येक मनुष्य करू शकतो. जर ती गुंतवणूक केली, तर आपल्याला झाडे लावण्याची आवश्यकता नाही. हा ग्रह संकटात नाही, तर मानवी जीवन संकटात आले आहे. हे माणसाने लक्षात घेणे आवश्यक आहे. मला आशा आहे की आपण या सत्याचा स्वीकार करू आणि आवश्यक ती पावले उचलू.पर्यावरणीय संवर्धन, हरित तंत्रज्ञान, या सर्व गोष्टींची नक्कीच आवश्यकता आहे, पण सर्वात मूलभूत गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे की आपली लोकसंख्या चौपट झाली आहे  आणि आपण त्याबद्दल काहीही केलेले नाही, आणि अजूनही आपली वाढ सुरूच आहे, आणि ही सर्वात मोठी समस्या आहे.