शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

गोष्ट कशी असावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 04:26 IST

नवीन चित्रपटसृष्टीने नैतिकता पायदळी तुडविलेली आहे. त्यातून माणूस घडतो, असं वाटत नाही. वैभव आलं; पण सुख विरळ झालं.

- बा. भो. शास्त्रीजुनी पिढी गोष्टी ऐकून मोठी झाली. आताची पिढी कार्टून पाहात मोठी होत आहे. गोष्टीत संसार, शेतकरी, राजा, शिकारी, भिकारी असे अनेक विषय असतात. तिचं तात्पर्य कुठलातरी ज्ञानाचा पैलू सांगून जातो. काय करावं, काय करू नये हे त्यात सांगितलं जातं. ग्रामीण भागात गोष्ट सांगणारे काही गोष्टीवेल्हाळ माणसं असत. त्यांचा अभिनय, शब्दफेक, आवाजाचे चढ-उतार, गोष्टीनुसार विषयाला अनुकूल रसाविष्कार ते करीत असत. एकच गोष्ट तीन-चार तास चालायची. दोन तासांची करमणूक करणारा चित्रपट करोडो रुपये खर्च करून तयार होतो. गोष्ट स्वस्त असायची. आजच्या कथाकथन, एकपात्री प्रयोगांचा उगम तिथूनच झाला आहे. मनावर चांगले संस्कार त्यातून मिळत होते. एक आटपाट नगर होतं, इथून प्रत्येक गोष्ट सुरू होते. सर्वज्ञ गोष्टीवेल्हाळ होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा स्वतंत्र ग्रंथ आहे. एकदा नागदेव आणि पाठक दोघांची एकांतात चर्चा रंगली. ती तर्कवितर्काने वादरूप झाली. चर्चेचं भांडणात रूपांतर झालं. तुला काही येत नाही, असे दोघेही परस्पराला म्हणत होते. तेवढ्यात सर्वज्ञ तेथे गेले आणि चर्चेचं स्वरूप सुसंवादी असावं, त्याचं फलित कसं असावं यावर एक सुंदर सूत्र सांगितलं, ‘सुख: श्रेय: शृंगारु इये तीनि नाही ते काईगा गोष्टी ते अरण्यरुदन की’. चर्चा, मंथन, वार्ता, कथा, कहाण्या ही गोष्टीचीच रूपं आहेत. गोष्टीचं स्वरूप, लक्षण सांगताना सुख, श्रेय आणि शृंगार त्यात असावेत, नसता गोष्टीचं अरण्यरुदन होतं. सांगणाऱ्या, ऐकणाºया आणि पाहणाºया सगळ्यांना ती सुखद वाटावी, समाधान देणारी असावी. नवीन ज्ञान मिळाल्याचं सुख, मौलिक इतिहास कळल्याची तृप्ती लाभली पाहिजे. आता चॅनेलवरील बातम्या ऐकून थोडंसं सुख पदरात पडतं, दु:ख डोंगराएवढं मिळतं. माणसं अनावश्यक चर्चा करतात. नवीन चित्रपटसृष्टीने नैतिकता पायदळी तुडविलेली आहे. त्यातून माणूस घडतो, असं वाटत नाही. वैभव आलं; पण सुख विरळ झालं.