शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

त्याचा कोव्हीड रिपोर्ट 'निगेटिव्ह' आला, पण माणूस 'पॉझिटिव्ह' झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:47 IST

या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम कोण करत असेल तर ते म्हणजे आपले जन्मदाते माता पिता. त्यांना दुखावण्याची चूक करू नका.

गेल्या दीड वर्षात कोव्हीड काळाने आयुष्याकडे बघण्याचा, नातेसंबंधांना पारखण्याचा, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा आणि कठीण प्रसंगाला धीराने तोंड देण्याचा पाठ शिकवला. पण याही पलीकडे अनेकांच्या आयुष्यात विविध प्रकारे परिवर्तन घडले. जसे की या माणसाच्या बाबतीत घडले... 

आज सकाळीच ऐकलेली ही गोष्ट. कोरोनाच्या पहिल्या लाटेतली अर्थात गेल्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळातली. तेव्हा सर्वत्र परिस्थिती अतिशय गंभीर होती. एक माणूस दोनदा कोव्हीड चाचणी करून तिसऱ्यांदा चाचणी करून घेण्यासाठी दवाखान्यात दाखल झाला. आधीच्या दोन चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोव्हीड विभागात ठेवले होते. वीस दिवस तिथे राहिल्यानंतर त्याला कधी एकदा घरी जातो असे झाले होते. अपेक्षेप्रमाणे त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्याला घरी जाण्याची मुभा मिळाली. 

त्याला खूप आनंद झाला. एक रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याने दवाखान्यातून डॉक्टर आणि परिचारिकांनी त्याला आनंदाने निरोप दिला. तो घरी येतोय ही वार्ता कळताच त्याच्या सोसायटीत उत्सवाचे वातावरण तयार झाले. सुरक्षित अंतर राखून सर्वानी त्याचे स्वागत केले. पुष्पगुच्छ दिला. नाचत गात स्वागत झाले. त्याने आपले घर गाठले. बायकोने ओवाळून स्वागत केले. मुलांनी आनंद साजरा केला. परंतु त्या सर्वांशी काही न बोलता तो माणूस थेट आतल्या खोलीत गेला. खोलीचे दार उघडले आणि आईला घट्ट मिठी मारली. 

आईने त्याला मायेने जवळ घेतले आणि म्हणाली, 'सुखरूप घरी आलास, आता कुठे माझा जीव भांड्यात पडला. एकट्याला काही त्रास नाही ना झाला?'आईचे हे शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी तराळले. तो आईचे पाय धरून माफी मागू लागला. तो कसली माफी मागतोय हे आईला कळेना. तिने त्याला सावरत उभे केले. तो मात्र आईचे हात धरून म्हणाला, 'आई, गेले वीस दिवस मला एकाकी बंदिस्त केलेले असताना त्या एकांताने जीव नकोसा झाला होता. पण त्याक्षणी जाणीव झाली, की बाबा गेल्यानंतर गेली पाच वर्ष मी तुला आयसोलेट वॉर्ड मध्ये ठेवल्यासारखी एकाकी ठेवली आहे. मला खूप पश्चात्ताप झाला. यापुढे तुला एकटीला ठेवणार नाही. तुला या खोलीत न ठेवता आमच्या बरोबर घरातल्यांमध्ये ठेवीन. आई मी चुकलो, मला फार कर. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण माझ्या चुकांची जाणीव होऊन माझा दृष्टिकोन पॉझिटिव्ह झाला!'

या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम कोण करत असेल तर ते म्हणजे आपले जन्मदाते माता पिता. त्यांना दुखावण्याची चूक करू नका. या व्यक्तीला स्वानुभवातून जसा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला, ही कथा वाचून आपणही आपला दृष्टिकोन बदलूया आणि माता पित्याची सेवा, कुटुंबावर प्रेम, आप्त स्वकियांशी स्नेह आणि सर्वांशी सहानुभूतीने वागण्याचा सदैव प्रयत्न करूया.